मुंबई -आगामी विधानसभा निवडणूक लढवायची की नाही ? याबाबत आज राजगड या मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात 36 विभाग अध्यक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांनी निवडणूक लढवावी, असा एक सूर उमटला. तो अहवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सादर करण्यात येईल, असे मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी म्हटले.
हेही वाचा- अर्थव्यवस्थेच्या कॅन्सरवर हे लोक बाम लावून इलाज कराताहेत - गौरव वल्लभ
अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी मनसे नेते मंडळी आणि सरचिटणीस यांच्या सोबत राज ठाकरेंची चर्चा झाली होती. आज मनसे विभाग अध्यक्ष यांच्याकडून घेण्यात आलेल्या अहवालावर अंतिम निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेतील, असे नांदगांवकर यांनी सांगितले. राज ठाकरे या अहवालाबाबत सकारात्मक विचार करतील. आतापर्यंत पक्षाने "एकला चलो"ची भूमिका घेतलेली आहे. अजूनही आघाडीसोबत न जाता "एकला चलोची" भूमिका आहे. महाराष्ट्रातील अनेक लोकांशी चर्चा केलेली आहे. ग्रामीण भागातील ही अनेक चांगली कामे आहेत. ईव्हीएम वर शंका असल्यामुळे आम्ही ईव्हीएमवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. अमित ठाकरे हे आजच नव्हे तर नेहमी सोबत असतात, असे नांदगांवकर यांनी सांगितले.