ETV Bharat / state

Raj Thackeray Met CM : टोल प्रकरणी राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, 'शिवतीर्थ'वर होणार निर्णायक बैठक - Toll Naka Plaza Issue

Raj Thackeray Meets CM Eknath Shinde: राज्यातील टोलचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यातील विविध ठिकाणच्या टोलच्या मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली.तर शुक्रवारी सकाळी 8 वाजता शिवतीर्थावर निर्णायक बैठक होणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.

Raj Thackeray Meets CM Eknath Shinde
टोल प्रकरणी राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 12, 2023, 9:17 PM IST

मुंबई : Raj Thackeray Met CM Eknath Shinde : टोल मुद्द्यावरुन राज ठाकरे पुन्हा आक्रमक झाले आहेत. शिवसेना आणि भाजपावर निशाणा साधत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील टोल प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारला शेवटचा इशारा देखील दिला होता. राज्यातील टोल प्रश्नासंदर्भात पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील प्रश्न उपस्थित केले होते.

मुख्यमंत्र्यांची घेतली भेट : आपण लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली होती. त्यानुसार राज ठाकरे यांनी गुरुवारी (12 ऑक्टोबर) सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन पत्र दिलंय. शुक्रवारी सकाळी 8 वाजता माझ्या घरी महत्त्वाची बैठक होणार आहे. त्या बैठकीला कोण उपस्थित असतील याची माहिती मी आता देणार नाही. पण, या बैठकीनंतर 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन मी तुम्हाला सर्व माहिती देईल, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

टोलविषयी लोकांच्या मनात प्रचंड खदखद : राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना एक पत्र देखील दिलंय. यात त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रात फिरताना आणि लोकांशी बोलताना टोलविषयी लोकांच्या मनात प्रचंड खदखद असल्याचं जाणवतं. टोल आकारणीबाबत पुरेशी स्पष्टता नसल्यामुळं ही अस्वस्थता असू शकते. मध्यंतरी याच विषयावर अविनाश जाधव आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले होते. तिथेही नागरिकांनी त्यांच्या मनात असलेला संताप व्यक्‍त केला होता. एकंदरच या विषयावर राज्य-शासनानं पारदर्शकता राखली पाहिजे म्हणजे जनतेच्या मनात काही शंका राहणार नाहीत आणि लोकांच्या रागाचा उद्रेक होणार नाही.

पत्रात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले 8 मुद्दे

१) मुंबईत शिरतानाचे जे पाच पथकर नाके आहेत ते कशासाठी आहेत? म्हणजे कुठल्या कुठल्या कामाचा खर्च भरून काढण्यासाठी त्यातून पथकर जमा केला जातो? त्याचा सविस्तर तपशील जाहीर करावा.

२) फक्त ह्या पाच पथकर नाक्यांवर नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक पथकर नाक्‍यावर भांडवली परिव्ययाचा तपशील का जाहीर केला जात नाही? यात अ) बांधणीचा खर्च ब) देखभालीचा खर्च क) भांडवलावरील व्याज ड) वसुली करण्यासाठी होत असलेला खर्च याचा समावेश असायला हवा. तसेच त्या पथकर नाक्‍यावर कधीपासून वसुली चालू आहे? ती कधी संपणार आहे? क) कुठल्या वाहनांना किती पथकर असणार आहे? ड) आतापर्यंत किती वसुली झाली? इ) मागील आठवड्यात किती वाहनांनी किती पथकर भरला? याचा तपशील असला पाहिजे.

३) महाराष्ट्राच्या प्रत्येक पथकर नाक्यावर त्या पथकरातून सरकारनं मान्य केलेल्या निविदेनुसार काय काय सुविधा असल्या पाहिजेत याचा तपशील असला पाहिजे. ज्यात रस्त्याची गुणवत्ता, सर्व्हिस रस्ता, स्वच्छतागृहे, वैद्यकीय सेवा अशांसारख्या गोष्टी असाव्यात.

४) भारत सरकारनं हरित महामार्ग (वृक्षारोपण, प्रत्यारोपण, सौंदर्यीकरण आणि अनुरक्षण) निती, २०१५ आखली आहे. यानुसार महामार्ग बांधताना जी वृक्षतोड करावी लागते आणि त्यानं निसर्गाचा जो संहार होतो त्यावर उपाययोजना सांगितली आहेत. महाराष्ट्रात आजवर या धोरणानुसार काय काय काम झालं?

५) महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक पेट्रोल, डिझेल, सीएनजीवर रस्ते बांधणीसाठी विशेष अधिभार भरतो. तुमच्याकडून हा तपशील हवा आहे की, गेल्या १० वर्षात केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला यातून किती कर, महसूल जमा झाला आणि त्यातून महाराष्ट्रात किती, कुठे रस्ते बांधले गेले? अशा रस्त्यांवर टोल आकारला जातो का?

६) महाराष्ट्रात नवं वाहन खरेदी करायचं तर पथकर (रोड टॅक्स) द्यावा लागतो. अगदी पूर्वी आपण तो दरवर्षी भरायचो. नंतर सरकारला रस्ते बांधण्यासाठी निधी हवा म्हणून एकदम १५ वर्षांचा कर घ्यायला आपण सुरूवात केली. त्यामुळे पुढच्या १५ वर्षासाठी महाराष्ट्राचा नागरिक १५ वर्ष अगोदरच पैसे भरतो. दरवर्षी यातून राज्याला किती महसूल प्राप्त होतो? गेल्या १० वर्षात किती मिळाला? त्यातून किती रस्ते बांधले गेले? त्यावर टोल आकारला जातो का?

७) कधीकधी वाहनचालकांना प्रचंड वाहतूककोंडीचा अनुभव येतो. त्यात त्यांचा काहीच दोष नसतो. दोष व्यवस्थेचा असतो. अशा वेळी प्रवासास विलक्षण विलंब लागतो. मग अशा प्रसंगात जर वाहनचालक गतीनी वाहन चालवूच शकत नसेल तर टोल का घेतला जातो? यावर राज्य सरकारनी धोरण आखून जाहीर केत्रं पाहिजे.

८) कधीकधी टोल नाक्‍यावर प्रचंड गर्दी असते, अशा वेळी काही अंतरावर पिवळी पट्टी असते. ज्याच्या पुढे रांग गेली तर वाहनांना टोल न घेता सोडलं जावं असा नियम आहे. त्याविषयी राज्य सरकारची भूमिका काय? या नियमाचं पालन व्हावं म्हणून राज्य सरकार काय उपाययोजना करत आहे? कारण, एकटा-दुकटा वाहनचालक अशावेळी तिथल्या कर्मचारी वर्गासोबत हुज्जत घालू शकत नाही आणि म्हणून आपल्यावर अन्याय होतोय असं वाटूनही काही करता येत नाही.

टोल आकारणीला सरसकट विरोध : रस्ते बांधणी किंवा त्याच्या सुविधांसाठी पैसा लागतो याची आम्हाला कल्पना आहे. म्हणून, आम्हीच काय किंवा महाराष्ट्रातले सुजाण नागरिक टोल आकारणीला सरसकट विरोध करतील असं नाही. फक्त टोल तर दयायचा पण त्याच्या बदल्यात सुविधा तर मिळणार नाहीत किंवा किती टोल कुणाच्या खिशात जातोय हे कळत नाही अशी परिस्थिती असेल तर जनतेत रोष पसरणारच. आपण लवकरात लवकर या गोष्टींचा खुलासा करावा आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर हा सर्व तपशील मांडावा अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे. पण तरीही स्पष्टता आली नाही आणि लोक रस्त्यांवर उतरायची तयारी करू लागले तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्यासोबत असेल यांची खात्री देण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. Sunil Tatkare On Raj Thackeray : राज ठाकरे संधी पाहून आंदोलन करतात; सुनील तटकरे यांचा टोला
  2. MNS Toll Plaza Burn ; टोल आंदोलन चिघळलं; राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिकांनी पेटवला पहिला टोलनाका
  3. BJP VS MNS over Toll issue in Maharashtra : राज्यात टोलच्या झोलवरून भाजपा-मनसेमध्ये जुंपली, नेत्यांची टोलेबाजी तर कार्यकर्त्यांची आंदोलने

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.