ETV Bharat / state

Mira Murder case : मनोज साने डेटिंग अ‌ॅपवर होता ऍक्टिव्ह, गुगलवर सर्च करत होता 'ही' गोष्ट; सरस्वती वैद्यच्या मृतदेहावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

सरस्वती वैद्यच्या मृतदेहावर सोमवारी संध्याकाळी रे रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या बहिणींची डीएनए टेस्ट करून ओळख पटल्यानंतर पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी सरस्वतीचा मृतदेह तिच्या बहिणींच्या ताब्यात दिला होता. साने डेटिंग अॅपवर सक्रिय होता. त्याच्या मोबाईल फोनच्या तपशीलाच्या आधारे ( सीडीआर) त्याच्या संपर्कात असणाऱ्यांकडे पोलीस काही चौकशी करत आहे.

author img

By

Published : Jun 13, 2023, 11:25 AM IST

Mira Murder case
मनोज साने पोलीस तपास अपडेट

मुंबई : मीरा रोड येथील सरस्वती वैद्यच्या मृतदेहाचे तुकडे ७ जूनला मीरा रोड येथील घरात सापडले होते. ही घटना समोर येताच तिच्या तीन बहिणींनी पोलिसांना संपर्क केला होता. जे जे रुग्णालयात तिच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. पोलीसांना मिळालेले तिच्या शरीराचे तुकडे जुळविण्यात आले होते. सोमवारी संध्याकाळी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन बहिणींच्या ताब्यात दिला होता. बहिणीच्या मृत्यूने तीनही बहिणींना मोठा धक्का बसला आहे.

दक्षिण मुंबईतील जे जे रुग्णालयातुन मृतदेह मिळाल्यानंतर लगेचच गुप्तपणे रे रोड येथील स्मशानभूमीत तिच्या बहिणी, मोजके नातेवाईक आणि पंचांच्या उपस्थितीत तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सरस्वतीचा कथित पती मनोज साने याने तिची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे कारवतीने तुकडे करून ते कुकर मध्ये शिजवून व्हिलेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता.

विषप्रयोग झाल्याची शक्यता मनोज साने याने फेकलेल्या मृतदेहाच्या अवशेषांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सोमवारी साने याला घरात तसेच घरा शेजारील नाल्यात जाऊन शोध घेतला. त्याच्या घरातून पोलिसांनी १३ विविध प्रकारचे पुरावे गोळा केले आहेत. त्यात कुकर, करवत, बादल्या, पातेले आदींचा समावेश आहे. हत्येपूर्वी सरस्वतीवर विषप्रयोग झाल्याची शक्यता असून त्यादृष्टीने देखील पोलीस तपास करत आहेत. साने गुगलवर यासंदर्भातील माहिती देखील मिळवत होता, असे पोलिसांनी सांगितले.

हत्येचे कारण अद्याप समजले नाही-साने याने सरस्वती बरोबर काही वर्षांपूर्वी वसईच्या तुंगारेश्वर येथील मंदिरात जाऊन लग्न केले होते. दोघांमध्ये मतभेद होते. साने डेटिंग अॅपवर सक्रिय होता. त्याच्या मोबाईल फोनच्या तपशीलाच्या आधारे ( सीडीआर) त्याच्या संपर्कात असणाऱ्यांकडे पोलीस काही चौकशी करत आहे. सरस्वतीचा मोबाईल फोन देखील मनोज साने वापरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन वर्षापूर्वी सरस्वतीच्या बहिणीने आत्महत्या केली होती. मनोज सानेने सरस्वती वैद्यची हत्या का केली, याचे अद्याप कारण समोर आलेले नाही. मनोज सानेने सरस्वतीला कीटकनाशक दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासंदर्भात मनोज साने गुगलवर यासंदर्भातील माहिती देखील मिळवत होता, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा-

  1. Saraswati Vaidya Murder Case: मनोज साने आणि सरस्वतीने मंदिरात केले होते लग्न; बहिणीचा दावा
  2. Meera Road Murder: सरस्वती वैद्यच्या बहिणींना 'ते' फोटो पाहून अश्रू अनावर, कठोर शिक्षेची पोलिसांकडे केली मागणी
  3. Saraswati Vaidya Murder Case: सरस्वती वैद्यचा मृतदेह उद्या बहिणींना देणार, पुरावे गोळा करण्यावर पोलिसांचा भर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.