मुंबई - शरद पवार यांनी जस्टिस लोया प्रकरणावर बोलताना सांगितले होते, की आमच्याकडे अशी तक्रार आली तर चौकशी केली जाईल. त्यानुसार एखाद्या तक्रारदाराकडून सबळ पुरावे आणि तक्रार आली तर आमचं सरकार त्या प्रकरणाची चौकशी करण्यास तयार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज (बुधवारी) मुंबईत दिली.
हेही वाचा - वंचित समाजाला न्याय देण्यासाठीच आरक्षण - मुख्यमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आज एक महत्वाची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुख्य उपस्थितीत तीन तास झालेल्या बैठकीमध्ये मंत्रालायातील करण्यात येणारे शासकीय कामकाज, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दिशा आणि पक्ष संघटना मजबूत करण्यास संदर्भात महत्त्वाची चर्चा झाली असल्याची माहिती मलिक यांनी दिली.
न्यायाधीश लोया प्रकरणात नुकतेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याविषयी तक्रार आल्यास चौकशी केली जाईल असे विधान केले होते, त्यावर मलिक यांना सवाल विचारला असता ते म्हणाले, "जस्टिस लोया प्रकरणात तक्रारदारकडे जर सबळ पुरावे असतील आणि तशा प्रकारची तक्रार त्यांने केली तर, या प्रकरणाची पुन्हा चौकशी सरकार करेल यासाठीची भूमिका पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार स्थापन झाल्यावरच स्पष्ट केली होती."
हेही वाचा - विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचे पंडित नेहरू यांच्या विरोधात वादग्रस्त विधान.. परिषदेत गदारोळ