ETV Bharat / state

'कांदा उत्पादकांना उद्ध्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा डाव'

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा डाव असून, केंद्र सरकार नेमके काम कुणासाठी करते, असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्राला केला आहे.

chhagan bhujbal
मंत्री छगन भुजबळ
author img

By

Published : Oct 27, 2020, 4:33 PM IST

Updated : Oct 27, 2020, 10:01 PM IST

मुंबई - एकीकडे कांद्यावर निर्यात बंदी आणून केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱयांना अडचणीत आणले आहे. दुसरीकडे कोरोना संकटाने कांदा उत्पादकांवर उपासमारीची वेळ आली आहे. असे असताना आयकर विभागाच्या धाडी टाकून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा डाव असून, केंद्र सरकार नेमके काम कुणासाठी करते, असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्राला केला आहे.

मंत्री छगन भुजबळ

हेही वाचा - खासगी शाळांच्या फीबाबत सरकार निर्णय घेऊ शकत नाही, शिक्षण संस्थांची न्यायालयात याचिका

आयकर विभागाच्या धाडी टाकून शेतकऱयांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न

कांदा प्रश्नाबाबत केंद्र सरकारने जो निर्णय घेतला आहे तो राज्यातील आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांना अडचणीचा ठरत आहे. कोरोनाच्या संकटात शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याचे भाव वाढत असतानाच केंद्राने निर्यातबंदी घातली. निर्यातबंदी केल्यानंतर इराणचा आणि पाकिस्तानचा कांदा भारतात आणायचे काम सुरू आहे. आता तर कांद्याचे कोठार म्हणून ओळख असलेल्या लासलगाव व इतर ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. बारा महिने काम सुरू असते अशावेळी धाडी टाकू शकत होते. परंतु, आता शेतकरी अडचणीत असताना धाडी टाकायच्या आणि त्यांच्यावर दबाव टाकायचा हे काम सुरू आहे. यावरही समाधान मिळाले नाही म्हणून २५-५० यापेक्षा जास्त कांदा साठा असता कामा नये असा नवीन आदेश काढला आहे, असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत -

पंतप्रधानांनी कांद्याला दीडपट आणि दुप्पट भाव मिळेल, असे सांगितले होते. परंतु, आजच्या घडीला कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या कांद्याच्या भावाची सरासरी काढली तर लक्षात येईल की, आजही दीडपट आणि दुप्पट भाव मिळत नाही. शिवाय खर्चसुद्धा निघत नाही, ही व्यथा मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली. अर्थचक्राला गती देण्याचे काम सुरू असताना कृषी उत्पादनाच्या अर्थव्यवस्थेला गती यायला पाहिजे. परंतु, त्यांना दाबून टाकण्याचे काम सुरू असल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही चर्चा झाली आहे. शिवाय कांदा उत्पादकांना लिलाव सुरू करण्याची विनंती केली आहे. जर लिलाव सुरू झाला नाही तर कांदा घरात पडून सडून जाईल आणि मग शेतकर्‍यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही, अशी भीती मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

Last Updated : Oct 27, 2020, 10:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.