मुंबई : राज्यातील हजारो जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या रखडल्या (transfer of inter district teachers) होत्या. आता 20 ऑक्टोबर रोजी ग्रामविकास विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार आजपासून आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्या व पदस्थापना केली जाणार (Order issued for transfer of teachers) आहे. या निर्णयामुळे शिक्षकांना दिवाळीच्या तोंडावर दिलासा मिळाला आहे.
'या' शिक्षकांना सवलत : जिल्ह्यांतर्गत बदल्या (inter district teachers) होण्यासाठी हजारो शिक्षकांनी मागणी केली होती. या मागणीमध्ये ज्या शिक्षक महिलांना लहान बाळ आहे, आणि ज्या गरोदर आहेत. त्यांच्यासाठी विशेष सवलत देण्यात यावी ; अशी देखील मागणी केली होती. त्यामुळे शासनाने 2021 च्या निर्णयानुसार ज्या शिक्षिका गरोदर आहेत, त्यांना सोयीनुसार पदस्थापना (Mh goverment Order issued) द्यावी.
निर्णयाची त्वरित अंमलबजावणी : तसेच ज्यांना दोन वर्षापेक्षा लहान बाळ आहे, त्यांना देखील सोयीनुसार पदस्थापना द्यावी . या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी (Order issued for transfer) होईल, असे देखील जारी केलेल्या आदेशात म्हटलेले आहे. या निर्णयामुळे महिलांना आधीच्या ठरलेल्या धोरणानुसार सवलत दिल्यामुळे आपल्या मुलाबाळांचे संगोपन करता येईल. तसेच आपल्या पद्धत स्थापनेचे काम देखील सांभाळता येईल. ज्या शिक्षकांची तीन वर्ष सेवा झालेली असेल, त्यांची बदली (Transfer of Teachers) होईल.