ETV Bharat / state

BMC : पालिकेच्या जलतरण तलावाची सदस्यता ३ जानेवारीपासून पारदर्शक पद्धतीने; ‘लाईव्ह डॅशबोर्ड’ सुरु होणार

कोरोना विषाणूचा प्रसार ( Spread of corona virus ) प्रभावामुळे मुंबई महापालिकेचा जलतरण तलाव बंद ( Mumbai Municipal Corporation swimming pool ) होता. मात्र, जलतरण मागील वर्षी पुन्हा सुरु करण्यात आला ( Municipal Corporation swimming pool ) होता. जलतरण तलावाचा ( swimming pool ) लाभ घेण्यासाठी पालिका ३ जानेवारीपासून ऑनलाईन नोंदणी सुरु करणार आहे.

Municipal Corporation swimming pool
Municipal Corporation swimming pool
author img

By

Published : Jan 1, 2023, 5:33 PM IST

मुंबई - मुंबईत मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रसार ( Spread of corona virus ) आहे. तेव्हापासून पालिकेची जलतरण तलाव बंद ( Municipal Corporation swimming pool ) करण्यात आला होता. हा तलाव मागील वर्षी पुन्हा सुरु करण्यात आला. मात्र त्यानंतर नागरिकांना सभासद होऊन तलावाचा वापर करणे शक्य होत नव्हते.

Municipal Corporation swimming pool
Municipal Corporation swimming pool

त्रैमासिक, मासिक सदस्यत्व देण्याचा निर्णय - या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांना तलावांचा लाभ ( swimming pool ) घेता यावा म्हणून ३ जानेवारीपासून त्रैमासिक, मासिक सदस्यत्व देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे जास्तीत जास्त मुंबईकरांना जलतरण तलावांचा आनंद घेता येणार आहे. तसेच डॅशबोर्डच्या माध्यमातून तलावात किती लोक आहेत हे सदस्यांना कळणार असल्याने ते त्यांच्या वेळेनुसार तलावाचा लाभ घेऊ शकतील, अशी माहिती पालिकेचे उप आयुक्त किशोर गांधी यांनी दिली.

swimming pool
पालिकेच्या जलतरण तलावाची सदस्यता ३ जानेवारीपासून

३ जानेवारीपासून ऑनलाईन नोंदणी - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील असलेल्या चार जलतरण तलावांचे सभासदत्व घेण्याच्या पद्धतीत पारदर्शकता आणण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने ऑनलाईन सभासद नोंदणी प्रणाली विकसित करून २३ ऑगस्ट २०२२ पासून नागरिकांसाठी खुली केली होती. जलतरण तलावांच्या सदस्यत्वासाठी प्रथमच सुरु करण्यात आलेल्या या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेस उत्साहवर्धक प्रतिसाद लाभला. हा प्रतिसाद लक्षात घेऊन आता सदर सुविधा अधिक व्यापक करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. नवीन वर्षात येत्या ३ जानेवारी २०२३ पासून नव्याने सभासद नोंदणी सुरू करण्यात येत आहे.

Municipal Corporation swimming pool
पालिकेचा जलतरण तलावा

सभासद नोंदणीसाठी - https://swimmingpool.mcgm.gov.in/ या संकेतस्थळासह बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावर (होम पेज) जलतरण तलाव वार्षिक सदस्यत्व नोंदणीची ‘लिंक’ असेल. या लिंकवर क्लिक केल्यानंतर उघडणा-या वेब पेजवर ऑनलाईन अर्ज असेल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

इतके असेल नोंदणी शुल्क - अर्ज भरुन सबमिट केल्यानंतर ऑनलाईन शुल्क भरणा करावा लागेल. हे ऑनलाईन शुल्क वार्षिक, त्रैमासिक, मासिक दैनंदिन या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. तरण तलावाच्या आकारानुसार वेगवेगळी शुल्क रचना असून या अंतर्गत वार्षिक शुल्क रुपये ८,०००/- ते रुपये १०,०००/- इतके आहे. तर त्रैमासिक शुल्क हे रुपये २,२३०/- ते रुपये २,९००/- इतके आहे. मासिक शुल्क रुपये १,३०० इतके असून सभासदासोबत येणा-या पाहुण्यांसाठी दैनिक शुल्क हे रुपये २४०/- इतके आहे.

ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरणा - ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यानंतर व ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरणा केल्यानंतर निर्धारित कालावधीत जलतरण तलावाच्या कार्यालयात वैद्यकीय प्रमाणपत्र, आधारकार्ड, शुल्क भरल्याचा पावती क्रमांक सादर करावयाचा आहे. या कागदपत्रांच्या पडताळणीनंतर अर्जदाराचे सभासदत्व सक्रिय (Active) केले जाणार आहे. वार्षिक सभासदत्व उपलब्ध नसल्यास प्रतिक्षा यादीचा पर्याय असणार आहे. रुपये ५००/- इतके शुल्क भरून प्रतिक्षा यादीत नाव नोंदविता येईल. तसेच प्रतिक्षा यादीतून नाव कमी करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.

सत्र पद्धत बंद - तरण तलावांच्या वेळा या सकाळी ६.०० ते ११.०० व सायंकाळी ६.०० ते रात्रौ १०.०० वाजेपर्यंत असेल. सभासदांसाठी राखीव सत्र सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० सायंकाळी ५.०० ते ६.०० अशी असेल. सत्र पद्धत बंद करण्यात आली असून सभासद तरण तलावांच्या वेळांमध्ये तरण तलावाच्या क्षमतेनुसार केव्हाही येऊ शकतो. सभासदांसाठी असलेली पूर्वीची ४५ मिनिटांची वेळ वाढवून ६० मिनिटे करण्यात आली आहे. सभासदाने ६० मिनिटांपेक्षा जास्त वापर केल्यास त्याचा सभासदत्व कालावधी कमी करण्यात येईल.

तलाव आरक्षित करण्याची सुविधा - सभासदाला त्याच्या पाहुण्यांसाठी ऑनलाईन तिकिट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. तरण तलाव सुविधा वापरणाऱया अभ्यागतांसाठी विशेष नोंदणी सुविधा असेल. दुपारी १.०० ते ४.०० ह्या कालावधीत संपूर्ण तरण तलाव आरक्षित करण्याची सुविधा असणार असून यासाठी प्रति तास रुपये २०,४३०/- इतके शुल्क असणार आहे.

या ठिकाणी आहेत तलाव - दादर पश्चिम परिसरातील महात्मा गांधी स्मारक ऑलिम्पिक जलतरण तलाव यासाठी ७०० वार्षिक सभासद व ८२५ त्रैमासिक सभासद, चेंबूर पूर्व परिसरातील जनरल अरुणकुमार वैद्य ऑलिम्पिक जलतरण तलाव यासाठी ३५० वार्षिक सभासद व ५५० त्रैमासिक सभासद, दहिसर पूर्व परिसरातील श्री मुरबाळीदेवी जलतरण तलाव यासाठी ३३० वार्षिक सभासद व २७५ त्रैमासिक सभासद आणि कांदिवली पश्चिम परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल ऑलिम्पिक जलतरण तलाव यासाठी २,१७८ वार्षिक सभासद व ५५० त्रैमासिक सभासद इतक्या ऑनलाईन सभासदत्वासाठी नोंदणी प्रक्रिया दिनांक ३ जानेवारी २०२३ पासून सुरु होणार आहे.

७ ठिकाणी नवीन जलतरण तलाव विकसित- दहिसर (पश्चिम) येथील कांदरपाडा जलतरण तलाव, मालाड (पश्चिम) येथील चाचा नेहरु मैदान जलतरण तलाव, अंधेरी (पश्चिम) येथील गिल्बर्ट हिल जलतरण तलाव, अंधेरी (पूर्व) येथील कोंडिविटा गाव जलतरण तलाव, वरळी येथील वरळी जलाशय टेकडी जलतरण तलाव, विक्रोळी (पूर्व) येथील टागोर नगर जलतरण तलाव आणि वडाळा येथील वडाळा अग्निशमन केंद्र जलतरण तलाव या ७ ठिकाणी नवीन जलतरण तलाव विकसित करण्याचे कार्य प्रगतिपथावर आहे, अशी माहिती देखील बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.