मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामेसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी २७ फेब्रुवारी २०२२ रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. (Megablock in Western Railway ) मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार ( CST to VidyaVihar ) अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या वसईरोड यार्डमध्ये रात्रकालीन मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक -
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी- विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉग कालावधीत सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ पर्यंत सुटणाऱ्या धीम्या रेल्वेगाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. या ट्रेन भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे धिम्या डाउन मार्गावर वळवल्या जातील. याशिवाय घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या सेवा विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि विद्याविहार, करी रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड आणि मस्जिद येथे थांबणार नाहीत.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक -
हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाउन मार्गावर रविवारी सकाळी ९. ४५ ते सायंकाळी ३. १२ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. ब्लॉग कालावधीत पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल येथून ठाण्याकडे जाणारी ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर ते खारकोपर/नेरुळ दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार चालविण्यात येतील.ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागावर विशेष उपनगरीय गाड्या धावतील.
पश्चिम रेल्वे मार्गवर रात्रकालीन मेगाब्लॉक -
पश्चिम रेल्वे मार्गांवरील रेल्वे रुळ दुरस्तीसाठी आणि ओव्हरहेड वॉयरचा देखभालीसाठी रविवारी वसई रोड यार्डमध्ये शनिवारी- रविवारी रात्री १ ते रात्री ३. ३० वाजेपर्यत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या साडे तीन तासांच्या ब्लॉक कालावधीत वसई रोड यार्डमध्ये अप आणि डाऊन दिवा मार्गिकेवर ब्लाॅक असेल. या ब्लाॅकमुळे पश्चिम रेल्वेवर 27 फेब्रुवारी रोजी कोणताही दिवसकालीन ब्लाॅक नसेल.