ETV Bharat / state

Mega Block: मध्य हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या रेल्वेचे मार्ग कसे असतील - Railway News

मध्य रेल्वेच्या मेन, हार्बर आणि ट्रान्स हार्बर या मार्गावरून सुमारे ४० लाख प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी रेल्वेकडून विविध कामे केली जातात. यासाठी मेगाब्लॉक घेतला जातो. असाच मेगाब्लॉक मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या रविवारी १२ मार्च रोजी घेतला जाणार आहे.

Megablock on Harbor Road
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
author img

By

Published : Mar 11, 2023, 9:38 AM IST

मुंबई: रविवार १२ मार्च २०२३ रोजी मध्य रेल्वेवर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याच्या पुढील जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत मुलुंड आणि माटुंगा दरम्यान गाड्या अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. मध्य रेल्वेवरील लोकल निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी व वांद्रे डाउन हार्बर मार्गावर, सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी व वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर, सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी बेलापूर पनवेल करीता सुटणारी आणि वांद्रे गोरेगाव येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

हार्बर मार्गावरील सेवा बंद: पनवेल बेलापूर वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव व वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद आहेत. ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला दरम्यान विशेष सेवा सुमारे २० मिनिटांच्या अंतराने चालवल्या जाणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मेन लाइन तसेच पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

हेही वाचा: Local Mega Block मुंबईकरांनो होळी खरेदीला निघण्यापूर्वी हे वेळापत्रक पहा मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.