ETV Bharat / state

आधी पाच फूट पाणी साचत होते, आता गुडघाभर पाणी साचते - महापौर किशोरी पेडणेकर - मुंबई पाऊस बातमी

मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीमुळे आम्ही मुंबईत पाणी साचणार नाही, असा कधीही दावा केलेला नाही, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

Mayor Kishori Pednekar
आधी पाच फूट पाणी साचत होते, आता गुडघाभर पाणी साचते
author img

By

Published : Jul 16, 2021, 8:08 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये कमी तासात जास्त पाऊस पडतो. आधी हिंदमाता सारख्या काही ठिकाणी पाच फूट पाणी साचत होते. आता तेथे गुडघाभर पाणी साचत आहे. हे गुडघाभर पाणी साचू नये यासाठीही आमचे प्रयत्न सुरु आहेत. आम्ही केलेल्या कामामुळे साचलेल्या पाण्याचा काही तासात निचरा होत आहे. मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीमुळे आम्ही मुंबईत पाणी साचणार नाही, असा कधीही दावा केलेला नाही, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया

'किती पाऊस पडला हे पण महत्त्वाचे' -

मुंबईत गुरुवारी रात्री पासून पाऊस पडला. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली. या दरम्यान पहाटे 4 ते सकाळी 7 वाजेपर्यंत तीन तासांत मुंबई शहरात 36 मिमी, पूर्व उपनगरात 75 मिमी, तर पश्चिम उपनगरात 73 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी रात्री 8 ते आज सकाळी 8 वाजेपर्यंत 12 तासांत मुंबई शहरात 64.45 मिमी, पूर्व उपनगरात 120.67 मिमी, तर पश्चिम उपनगरात 127.16 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे पाणी साचल्याने मुंबईत सखल भागात पाणी साचून रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर महापौर बोलत होत्या. यावेळी बोलताना गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण वाढले आहे. काही तासांत जास्त पाऊस पडत आहे. किती पाऊस पडला, हे पण महत्वाचे आहे, असे महापौर म्हणाल्या.

हेही वाचा - VIDEO : मुंबईत पावसाच कहर; रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम

'पाणी साचू नये यासाठी प्रयत्न' -

मुंबईमध्ये पाऊस पडल्यावर आधी जास्त प्रमाणात पाणी साचत होते. आता ब्रिमस्टोव्हेड, पम्पिंग स्टेशन, भूमिगत टाक्या बनवण्यात आल्या आहेत. यामुळे पाणी साचण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आधी पाच फूट पाणी साचत होते, आता गुडघ्यापेक्षा कमी पाणी साचत आहे. या पाण्याचा निचरा काही तासांत होत असल्याने मुंबईची तुंबापुरी म्हणून नका, असे आवाहन त्यांनी केले. मुंबईमध्ये पाऊस पडल्यावर काही तास पाणी साचते. हे विरोधकांनाही माहित आहे. मुंबईत पाऊस पडल्यावर गुडघाभर पाणी साचते, ते सुद्धा साचू नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचे महापौरांनी सांगितले.

'काही तास तर पाणी साचून राहणार' -

मुंबईत पावसामुळे पाणी साचल्याचे माहीती पडताच सकाळीच मिलन सब-वे, पार्ले सर्व्हिसरोड, कलवर्टची पाहणी केली. त्यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत चांदिवली येथे कार्यक्रम केल्यावर मिठी नदीची पाहणी केली. त्यावेळी पाऊस नसल्याने मिठी नदीमधील पाण्याचा निचरा सुरळीत होत होता. पाऊस पडला आणि आम्ही घरी बसलो, असे होत नाही. आम्ही पाहणी केली. मुंबईमध्ये काही तास तर पाणी साचून राहणार आहे. मात्र, त्याचा निचरा आधीपेक्षा लवकर होत आहे, असे त्या म्हणाल्या.

'हिंदमाताला कपड्यांचा सेल नाही' -

हिंदमाता येथे काही वेळ पाऊस पडला, तर काही वर्षांपूर्वी पाच फूट पाणी साचत होते. ते साचलेले पाणी दोन तीन दिवस राहत होते. आता त्याठिकाणी गुडघ्याच्या खाली पाणी साचून राहते. याठिकाणी आधी दुकानामधील कपडे भिजल्याने त्यांचा सेल लागत होता, आता तसा सेल लागत नाही. यावरून पाणी कमी साचत असल्याचा दावा महापौरांनी केला. सध्या गुडघाभर पाणी राहू नये म्हणून भूमिगत टाक्यांचे काम हाती घेतले आहे. ते पाणी सुद्धा साचू नये, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा- संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी उद्योग क्षेत्राचे नियोजन करा; मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.