ETV Bharat / state

Teacher Arrested : झारखंडमधील शिक्षकाचा पर्दाफाश, माटुंगा पोलिसांनी शिक्षकाला ठोकल्या बेड्या - cheated online from Jharkhand

माटुंगा पोलिसांनी झारखंडमधील एका 31 वर्षीय जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. या ठग शिक्षकाने बँकेचे कर्मचारी असल्याची बतावणी करून सुमारे 3,600 लोकांना एसएमएस आणि कॉलद्वारे ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी त्याला अटक केली आहे. मनजीत कुमार आर्य हा या प्रकरणातील चौथा अटक आहे. तर अन्य तिघांना पोलिसांनी तीन आठवड्यांपूर्वी अटक केली होती.

Teacher Arrested
Teacher Arrested
author img

By

Published : Feb 1, 2023, 7:54 PM IST

मुंबई : गेल्या वर्षी 25 डिसेंबर रोजी वसंत चेड्डा या 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला एक संदेश मोबाईलवर आला होता, तेव्हा हे फसवणुकीचे प्रकरण समोर आले होते. त्यात म्हटले आहे वापरकर्ताने KYC सबमिट न केल्यामुळे तुमचे बँक खाते ब्लॉक करण्यात आले आहे. तुमचा पॅन क्रमांक अपडेट करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. यानंतर लगेचच तक्रारदाराला बँक कर्मचारी म्हणून ओळखल्या जाणार्‍या एकाचा फोन आला. नंतर त्यांच्या फोनवर आलेला ओटीपी घेऊन त्यांच्या खात्यातून पैसे गायब करण्यात आले होते.

झारखंडमधील शिक्षकाचा पर्दाफाश : त्यानंतर चेड्डा यांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. पोलिसांनी आरोपीचे लोकेशन काॅल डिटेल काढून दोघांना आधिच बेड्या ठोकल्या होत्या. यात दोघे दिल्लीचे आहेत, तर एक झारखंडमधला आरोपी आहे. पोलिस ज्या नवीन संशयिताचा शोध घेत होते. तो झारखंडमधील शिक्षक असून देवघर येथून कार्यरत असलेल्या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. पोलिसांनी सांगितले की, त्याने आपली ओळख लपवली असल्याने त्याला अटक करणे कठीण होते. शाळेतील शिक्षक म्हणून त्याचा पारदर्शक रेकॉर्ड आणि स्थानिकांमध्ये चांगले नाव होते.

तीघांना अटक : त्यामुळे पोलिसांनी सर्च वॉरंट काढून त्याच्या निवासस्थानाची झडती घेतली. त्यात अनेक मोबाईल फोन, सिमकार्ड, एक लॅपटॉप, चेक बुक्स आणि सहा डेबिट कार्ड सापडले आहेत. त्याने गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्यांमध्ये सैफ अली उस्मान अली (२३) आणि मोहम्मद कलाम अन्सारी (२२) हे दोघेही दिल्लीचे असून अरुणकुमार नरेश मंडल (२४) हा आरोपी झारखंडमधील शेतकरी होते.

सिंधुदुर्ग : आंबोली घाटातील मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना संशयित आरोपीचा खोल दरीत मृत्यू झाल्याचे अखेर समोर आले आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली. भाऊसाहेब माने (रा. गोळेश्वर, ता. कराड), असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी निखील पवार (रा. सुर्यवंशी मळा, कराड) याला चौकशीसाठी आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उधार घेतलेले पैसे परत न केल्याने सोलापूर येथील एका व्यक्तीचा कारमध्ये आणत असताना झालेल्या मारहाणीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबोली घाटात मृतदेह टाकायला गेलेल्या कराडमधील दोघांपैकी एकाचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर हा बनाव उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आलेला व्यक्ती दरीत पडल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे घाटीतील दोन मृत्यूंचे गूढ अखेर उकलले आहे.

आंबोली घाटात दरीत पडून तरुणाचा मृत्यू : याबाबत अधिक माहिती अशी, आंबोली घाटात खोल दरीत पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरीत पडलेल्या तरुणाचा शोध सुरू केला. त्यावेळी पोलिसांना दोन मृतदेह सापडले. त्यामुळे दुसऱ्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलीस शोध घेत असताना त्यांना मृत तरुणाच्या मित्रावर संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. मृत तरुणाच्या मित्राने पोलिसांना माहिती दिली की, तो एकाचा खून करून मृतदेह दरीत टाकण्यासाठी आला होता. त्याच्या मित्राचा पाय घसरल्याने तो दरीत कोसळला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे घाटातील दोन मृतदेहांचे गूढ अखेर उकलले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा - Budget 2023 Highlights : बजेटमधून कुणाला काय मिळाले? वाचा, A to Z माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.