मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले. बीडमध्ये आंदोलकांनी तीन आमदारांच्या घरांची- कार्यालयांची जाळपोळ करत तोडफोड केली. आमदार अमरसिंह पंडित यांच्या घराबाहेर जमलेल्या मराठा आंदोलकांच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
Live Updates-
- 'आम्ही जातो आमच्या गावा.. आमचा रामराम घ्यावा'. आरक्षण नसल्याने फाशी घेत असल्याची चिट्ठी लिहून युवकाने आत्महत्या केली. संगमनेर तालुक्यातील युवकाने आत्महत्या केली. घराच्या मागील बाजूस पत्राच्या शेडमध्ये गळफास घेतला आहे. आज पहाटेच्या सुमारास घटना घडली आहे. सागर भाऊसाहेब वाळे या 25 वर्षीय युवकाने आत्महत्या केली.
- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील टोल नाका आंदोलकांनी फोडलाय. यावेळी कर्मचारी टोलनाका सोडून पळाले. टोल नाक्यावरून वाहने टोल न भरताच जात आहेत. टोल नाक्याच्या कॅबिन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
- मराठा आंदोलकांनी पुणे-बंगळुरु महामार्गावरील नवले पुलावर टायर जाळले
- आमदार राजू नवघरे, निलेश लंके, कैलास पाटील, राहुल पाटील, बाळासाहेब आजबेही राज्यपालांना भेटण्यासाठी राजभवनावर पोहोचले आहेत. मराठा आरक्षणाबाबत राज्यात उद्रेक होत असताना त्यांची राज्यपाल भेट महत्त्वपूर्ण आहे.
- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषेदेत मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडली. उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्रातील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या केंद्रातील मंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याकडे लक्ष देत नसेल तर महाराष्ट्रातील सर्व पक्षातील खासदारांनी राजीनामा द्यावा, असे आवाहन राज्यातील खासदारांना केले.
- आज सायंकाळी सहा वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत खासदार-आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत बैठकीत सर्व खासदार-आमदारांनी सामुदायिक राजीनामे द्यावेत, असे खासदार संजय मंडलिक यांनी आवाहन केले. कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ येथे आंदोलकांनी एसटी बस फोडली आहे.
- मनोज जरांगे यांनी शांततेने आंदोलन करण्याचं आवाहन केलं. कुणीही आत्महत्या करू नका. मी कालपासून पाणी पित आहे. तुम्ही खाद्यांला खांदा लावू लढा, असे जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. एका पुराव्यासह आरक्षण देता येते. गोरगरीब मराठे कुणबी प्रमाणपत्र घेतली. समितीकडे आरक्षणासाठी अनेक पुरावे आहेत. शेती शब्द लाज वाटण्याइतके मराठा खालच्या विचाराचे नाहीत. अर्धवट मराठा आरक्षण मान्य नाही. मराठा आरक्षणाकरिता स्वतंत्र अधिवेशन घेण्यात यावे. ज्यांना घ्यायच त्यांनी कुणबीतून आरक्षण घ्यावे. ६० टक्के मराठ्यांना कुणबीतून आरक्षण मिळत आहे. शेतीवर आधारित १६ ते १७ जातींना आरक्षण मिळाले. मग, मराठ्यांना आरक्षण का नाही?
- पुढे मनोज जरांगे पाटील म्हणाले, राजकीय नेत्यांना गावबंदी कायम आहे. मराष्ट्रातील मराठा समाज १०० टक्के शांत आहे. साखळी व आमरण उपोषण सुरू ठेवा. नेत्याकडे जायचं नाही. त्यांना इकडे येऊ द्यायचं नाही. २००४ मधील मराठा व कुणबी एक असल्याचा जीआर दुरुस्त करा. आमदारांनी मुंबईत ठाण मांडून बसावं. मराठा समाजानं संयम धरावा. पटकन आरक्षण द्या, मराठे शांत राहतील. आपल्याला आरक्षण मिळवून द्यायचं आहे. सत्ताधाऱ्यांकडून आरक्षण घ्या. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणाऱ्यांच योगदान विसरता येणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी म्हटलं.
- मराठा आरक्षणासाठी आमदारांनीच आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंत्रालयासमोरच निलेश लंके, कैलास पाटील आणि राजू नवघरे यांनी उपोषण सुरू केले. आरक्षणावर तात्काळ तोडगा काढा. मराठ्यांना आरक्षणा द्या, अशी आमदारांनी मागणी केली.
- बीड जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी 49 जणांना अटक केली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली. राजकीय नेत्यांच्या घरासंह मालमत्तेला लक्ष्य करून हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर बीड जिल्ह्यातील काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, असे बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले. रात्री कोणताही अनुचित प्रकार घडला नसून परिस्थिती नियंत्रणात आहे.
- मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबईसह नाशिकमधील घराबाहेर पोलिसांनी सुरक्षा वाढविली आहे. दुसरीकडं भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरमधील घराबाहेर व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधील घराबाहेर पोलिसांनी सुरक्षा वाढविली आहे. मंत्रालयाकडं जाणाऱ्या मार्गावर पोलिसासह दंगल पथक तैनात करण्यात आले.
- मराठा आरक्षणावर राजकीय नेत्यांचे राजीनामा म्हणजे ढोंग आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
- कोल्हापूरात मराठा आरक्षणासाठी पंचगंगा नदीत उतरून आंदोलन करण्यात आलं. आरक्षणासाठी आंदोलकांकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आले. गुणरत्न सदावर्ते यांचाही यावेळी करण्यात निषेध करण्यात आला.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे फोन करून मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. मात्र, जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली.
- मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. त्यांची भेट घेण्यासाठी कोल्हापुरचे शाहू महाराज आज पहाटे जालन्याकडे रवाना झाले आहेत. महाराजांसोबत कोल्हापुरातील मराठा समन्वयकदेखील आहेत
- मनोज जरांगे पाटील यांना कोंढवा भागातील मुस्लिम समाजाच्या वतीने जाहिर पाठिंबा देण्यात आला आहे.
- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातल्या काचरेवाडी येथील मराठा बांधवाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. सोपान बाबुराव काचरे (वय 30 वर्ष रा. काचरेवाडी ता. जालना) असं आत्महत्या केलेल्या मराठा तरुणाचे नाव आहे. सोपान यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गावातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.
मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा- प्रकाश सोळंके-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यादोन आमदारांची घरे जाळण्यात आली आहेत. तर सत्ताधारी भाजपाच्या आमदाराच्या कार्यालयाची आंदोलकांनी तोडफोड केली. उपोषणाच्या 6व्या दिवशी मनोज जरांगे पाटील हे स्टेजवर कोसळले. त्याची प्रकृती बिघडल्यानं उपस्थित असलेल्यांनी त्याच्या मदतीसाठी धाव घेतली होती. आमदार प्रकाश सोळंके हे माध्यमांशी बोलताना म्हणाले, आंदोलकांनी माझ्या निवासस्थानाला चारही बाजूंनी घेराव घातला. तेव्हा मी घरी नव्हतो. पण, कोणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. माझ्या घरावर दगडफेक करण्यात आली. वाहनेही जाळण्यात आली. मी मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पाठीशी उभा आहे. आजतागायत मी चार वेळा निवडणूक जिंकली आहे.
आंदोलकांकडून जाळपोळ- राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते अमरसिंह पंडित यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेल्या मराठा आंदोलकांच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय सायंकाळी 7.30 वाजता जमावानं पेटवून दिले. जमावानं नगर परिषद कार्यालय गाठून इमारतीवर दगडफेक केली. त्यानंतर आंदोलकांनी बीडमधील सुभाष रोड परिसरातील ज्वेलर्स दुकानाला लक्ष्य केले. त्यानंतर दोन वाहने जाळण्यात आल्याच अधिकाऱ्यानं सांगितले.
राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात- बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर म्हणाले, प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावल्यानंतर जमाव हा माजलगावच्या नगरपरिषदेत गेला. जमावानं नगरपरिषदेच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जाळपोळ केली. तातडीनं नागरी कार्यालयात पोहोचलेल्या पोलिसांच्या पथकांनी लोकांना बाहेर काढले. बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी (सुमारे 100 कर्मचारी) मागविण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा-