ETV Bharat / state

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक; उपमुख्यमंत्र्यांची आंदोलकांसोबत चर्चा - राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक

Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलाय. मराठा समाजासह विरोधकांनी सरकारला यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केलीय. या पार्श्वभूमीवर आज (4 सप्टेंबर) राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Eknath Shinde
एकनाथ शिंदे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2023, 6:50 AM IST

Updated : Sep 4, 2023, 8:38 AM IST

मुंबई : Maratha Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलावली आहे. आज (४ सप्टेंबर) दुपारी ही बैठक होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयानं दिली.

मराठा नेत्यांसोबत फडणवीसांची चर्चा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलनाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच त्यांना चर्चेसाठी मुंबईला बोलावले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनीही मुख्यमंत्र्यांना या विषयावर चर्चेची विनंती केली होती. मराठा आंदोलक नेत्यांसोबत लवकरच सरकार बैठक घेणार आहे. मराठा आरक्षणासंबंधीच्या उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. ही सर्व माहिती उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

सरकार मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध : या आधी शनिवारी एकनाथ शिंदे म्हणाले होते की, राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. 'नोव्हेंबर २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युतीच्या सरकारनं मराठा आराक्षणाची घोषणा केली होती. उच्च न्यायालयानही हा निर्णय कायम ठेवला. पण सर्वोच्च न्यायालयाने वेगळा निर्णय दिला. हे कोणाच्या निष्काळजीपणामुळं घडलं हे सर्वांनाच माहीत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या न्यायालयात आहे. हे प्रकरण न्यायालयात लढण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे तयार आहे. काही अडचणी आहेत आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे', असं मुख्यमंत्री म्हणाले.

कायदा हातात घेऊ नका : राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलाय. जालना जिल्ह्यात आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात अनेक आंदोलक जखमी झाले. त्यावरून सरकारला टीकेचा सामना करावा लागतोय. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. ज्यांना या परिस्थितीतून राजकीय फायदा घ्यायचा आहे त्यांच्यापासून सावध राहण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. 'मी मराठा समाजाला आवाहन करतोय. त्यांनी आतापर्यंत आपल्या भावना अत्यंत संवेदनशीलपणे आणि शांतपणे व्यक्त केल्या आहेत. कृपया संयम बाळगा आणि कायदा हातात घेऊ नका', असं एकनाथ शिंदे म्हणाले.

आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती : या आंदोलनाचे नेते जरंगे पाटील यांच्याशी माझं बोलणं झालंय. त्यांच्या मागण्यांबाबत माझ्या अध्यक्षतेखाली बैठका झाल्या. त्यांच्या मागण्यांची शासनाकडून दखल घेण्यात आलीय. मात्र, त्यानंतरही आंदोलन सुरू झाले. मी जरंगे पाटील यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती, पण तरीही आंदोलन सुरूच होतं, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

जखमींवर सरकारी खर्चाने उपचार : दरम्यान, जरंगे पाटील यांची प्रकृती बिघडली. जिल्हाधिकारी आणि एसपी तिथे गेले कारण त्यांना त्यांच्या प्रकृतीची काळजी होती, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जरंगे पाटील यांना रुग्णालयात दाखल करावे, अशी विनंती ते करत होते. मात्र, त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. मी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत, असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं. या घटनेतील सर्व जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा :

  1. Curfew In Jalna District: जालन्यात 17 सप्टेबरपर्यंत जमावबंदी, नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे लवकरच आंदोलकांची घेणार भेट
  2. Jalna Maratha Protest : राज ठाकरेंचा मराठा आंदोलनाला पाठिंबा, हा अमानूष अत्याचार - मनसे
  3. Jalna Maratha Protest : मंत्रालयातून आलेला 'तो' अदृश्य फोन कोणाचा? 'लाठीचार्ज'वरुन संजय राऊतांचा सवाल

Last Updated : Sep 4, 2023, 8:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.