ETV Bharat / state

Maratha Protest : मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला; सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, तोडगा निघणार? - maratha protest jalna

Maratha Protest : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटलाय. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर मराठा समाज रस्त्यावर उतरलाय. या पार्श्वभूमीवर आज (11 सप्टेंबर) सर्वपक्षीय बैठक होणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2023, 7:38 AM IST

Updated : Sep 11, 2023, 8:07 AM IST

मुंबई - Maratha Protest : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडणार आहे. या बैठकीसाठी विरोधी पक्षाच्या शरद पवार गटाकडून राजेश टोपे आणि ठाकरे गटाकडून अंबादास दानवे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं आता या बैठकीतून तरी काही तोडगा निघतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. कुणबी प्रमाणपत्र मुद्द्यासाठी निवृत्त न्यायाधीक्षांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती एका महिन्यात अहवाद सादर करेल आणि त्यानंतर त्यातून मार्ग काढता येईल. तसेच न्यायालयात टिकेल असेच आरक्षण आम्ही मराटा समाजाला देणार आहोत - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

लोकप्रतिनिधींचा निषेध - जालना येथील मराठा आंदोलाचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. सकल मराठा समाज यामुळं आक्रमक झालाय. लोकप्रतिनिधींना आरक्षणाबाबत प्रत्येक ठिकाणी जाब विचारणात येत आहे. मात्र, धर्माबाद येथे जाब विचारणाऱ्या आंदोलकांवरच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दमदाटी केली. तर उस्माननगर येथे आंदोलकांसोबत अरेरावी करत अंगावर धावून गेल्याने आमदार शामसुंदर शिंदे यांचा नांदेड शहरात सकल मराठा समाजाच्या वतीनं रविवारी निषेध करण्यात आला.

Maratha Protest
निषेधासाठी बॅनरबाजी

मराठा समाज आक्रमक - सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींकडून आमदार, खासदार यांचा निषेध करण्यात येत आहे. जालना येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाकडून आंदोलन, उपोषण, मोर्चे काढण्यात येत आहेत. तसेच मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी विविध भागात मराठा बांधव उपोषणाला बसले आहेत. त्यातील अनेकांची तब्येत बिघडत चालली आहे. सरकरानं लवकर आरक्षण लागू करून हा विषय संपवण्याचं आवाहन मराठा समाज करत आहे.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; मनोज जरांगे म्हणाले...
  2. Kunbi OBC Protest : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नका, नाहीतर...; कुणबी-ओबीसी समाजाचा एल्गार
  3. Maratha Reservation History : ४० वर्षांपासून मराठा आरक्षणाचं भिजत घोंगडं, जाणून घ्या आजपर्यंतचा प्रवास

Last Updated : Sep 11, 2023, 8:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.