ETV Bharat / state

Mumbai crime : नववर्षाच्या पूर्वसंध्येला बॉम्बस्फोटची अफवा पसरवणाऱ्याला धारावीतून अटक

author img

By

Published : Jan 1, 2023, 9:26 AM IST

मुंबई शहरात तीन ते चार ठिकाणी बॉम्बस्फोट (Bomb threat) होतील, असे कवळे यांनी नियंत्रण कक्षाला सांगितले होते. (Mumbai crime) त्याने पोलिस नियंत्रण कक्षाला फोनवर ( Man arrested for bomb threat ) सांगितले की, अजहर हुसैन उत्तर प्रदेशातील आझमगढ येथून तीन चार शस्त्रे आणि आरडीएक्स घेऊन स्फोट घडवण्यासाठी निघाला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. प्रथमदर्शनी कवळे याने दारूच्या नशेत फोन केल्याचे त्यांनी सांगितले. ( bomb threat on new year eve )

Bomb threat
नववर्षाच्या पूर्वसंध्येला बॉम्बस्फोटची अफवा

मुंबई : नववर्षाच्या पूर्वसंध्येला काही ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी ( Bomb threat ) दिल्याप्रकरणी मुंबईतून (Mumbai crime) एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी नरेंद्र कवळे याने शुक्रवारी रात्री 8.56 ते 9.20 च्या दरम्यान पोलिस नियंत्रण कक्षाला (Police Control Room ) कॉल केल्यानंतर मध्य मुंबईतील धारावी येथून अटक करण्यात आली. ( Man arrested for bomb threat )

मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर : फोन आल्यानंतर ( Mumbai crime ) पोलिसांनी मध्य मुंबईतील धारावीपर्यंतचा मोबाइल क्रमांक ट्रॅक करून कवळे याला अटक केली. भारतीय दंड संहितेच्या कलम 182, 505 (1) आणि 506 (2) (गुन्हेगारी धमकी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला, पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज होत असताना, पोलिसांनी गेटवे ऑफ इंडिया, जुहू बीच, मरीन ड्राइव्ह आणि गिरगाव चौपाटी यांसारख्या गर्दीच्या ठिकाणांसह संपूर्ण शहरात सुरक्षा कडक केली होती. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एकूण 10,000 पोलीस कॉन्स्टेबल, 1,500 अधिकारी, 25 पोलीस उपायुक्त आणि सात अतिरिक्त पोलीस आयुक्त तैनात करण्यात आले आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय, राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) 46 प्लाटून, दंगल नियंत्रण पोलिसांच्या तीन तुकड्या आणि 15 क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) देखील तैनात करण्यात आल्या आहेत. थर्टी फर्स्टची रात्र सुरू झाली असून मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरला आहे. ( bomb threat on new year eve )

दिल्लीत हि घडला बॉम्ब अफवा प्रकार : दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर (Indira Gandhi Airport) एका विमानामध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. (bomb rumors in flight) विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी घाईघाईने विमान विमानतळाच्या एका कोपऱ्यात उतरवून चौकशी केली. यानंतर बॉम्बची बातमी खोटी असल्याचे समोर आले आहे. ज्या विमानामध्ये हा मेसेज लिहिला होता, ती स्पाईसजेटची फ्लाइट होती. जे सोमवारी जैसलमेरहून विमान प्रवाशांसह दिल्लीत पोहोचले. त्यात 117 विमान प्रवासी होते. विमानामध्ये बॉम्ब असल्याचा संदेश लिहिल्याप्रकरणी, या विमानामध्ये बॉम्ब असल्याचे सीटच्या मागे कोणी लिहिले होते, याचा शोध पोलिसांना अद्याप लागलेला नाही. विमानामध्ये बॉम्ब असल्याची बातमी आल्यानंतर सीआयएसएफ आणि दिल्ली पोलिसांसह इतर सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI Airport Delhi) जैसलमेरहून नवी दिल्लीला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच सर्व यंत्रणा तातडीने सक्रिय झाले. विमानातून प्रवासी उतरल्यानंतर शोध प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले, यावर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.