मुंबई - देशभर आज महाशिवरात्री साजरी होत होत आहे. शिवभक्त महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा-अर्चा करत आहेत. ओम आदिनाथ विश्वेश्वर मंदिर घाटकोपरमध्ये रात्री कीर्तन, भजन, तर सकाळी काकड आरती आणि दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे, असे मंदिराचे विश्वस्त गंगाराम काशीनाथ घुले यांनी सांगितले.
सोमवारी आलेल्या महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे, असे यावेळी संजय बाबू शेट्टी यांनी सांगितले तसेच मंदिराचे महत्वही पटवून दिले. महादेव धोंडीराम साळेकर यांनी महाशिवरात्री सोमवारी आली असल्याने महाशिवरात्रीचे महत्त्व विशद करताना सांगितले की, एक भिल्लवाणी झाडावर बसून बेलाचे पान तोडायचा आणि ती पाने महादेवाच्या पिंडीवर पडायची त्यामुळे त्याचा उद्धार झाला, असा इतिहास आहे.