ETV Bharat / state

Maharashtra Rain: राज्यात पावसाच जोर राहणार कायम, 'या' 3 जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांत अतिवृष्टीची शक्यता - राज्यात मुसळधार पाऊस

गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. राज्यात आजही मुसळधार पाऊस राहील असा, इशारा दिला आहे. हवामान विभागाने पालघर आणि ठाणे जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, सातारा आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. आज देखली येथे पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.

राज्यात पावसाच जोर राहणार कायम
राज्यात पावसाच जोर राहणार कायम
author img

By

Published : Jul 21, 2023, 9:34 AM IST

मुंबई : राज्यातील 36 पैकी 34 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होऊ लागला आहे. गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने आजही राज्यात मुसळधार पाऊस असेल, असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यांना उद्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाण्यासह बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हवामान अंदाज : हवामान विभागानुसार सध्या कमी दाबाचा पट्टा 20 अंश उत्तरेला आहे. सामान्य परिस्थितीतीहून तो दक्षिणेकडे झुकलेला आहे. उत्तर पश्चिम बंगालची खाडी आणि ओरिसा किनारपट्टी क्षेत्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्रही तयार झाले असल्याने पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथील जव्हार मोखाडा विक्रमगड वाडा भागात जोरदार पावसाला सुरुवात देखील झाली आहे. दरम्यान येथील शाळांना जिल्हा प्रशासानाने सुट्टी दिली आहे. हवामान खात्याने पुणे आणि रायगडसाठी रेड अलर्ट दिला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, सातारा आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. आज देखली येथे पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.

  • Nowcast warning 21.07,6:15Hrs
    For 2 Hrs
    Severe/Mod Thunderstorm TS with 🌩 at few places ovr Chandrapur,at isol places ovr Gadchiroli,Nagpur,

    TS with 🌩 likely at isol places ovr Wardha,Bhandara,Gondia,Yavatmal pic.twitter.com/hVFg22Kp4b

    — K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

येथील शाळा बंद : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग, पुणे येथील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. ठाणे,पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने खबरादारी म्हणून येथील शाळांना सुट्टी दिली आहे. तसेच या जिल्ह्यांमधील नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

  • Heavy to very heavy rainfall expected over parts Konkan and adjoining ghat areas of Madhya Maharashtra during next 24 hours. येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD…… भेट द्यI pic.twitter.com/cjjgae0Ztp

    — Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात पावसाशी संबंधित वेगवेगळ्या घटनांमध्ये गुरुवारी तीन जणांचा मृत्यू झाला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी सांगितले की, मंगळवारपासून पालघरच्या काही भागात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. वाणगाव ते चिंचणी रोड दरम्यान कारमधून तीन जण जात असताना अपघात झाला. हे तिघे कारने प्रवास करत होते, कलोली गावाजवळील रस्त्याच्या बाजुला असलेल्या नदीच्या पाण्यात त्याची कार वाहून गेली. स्थानिकांना दोन जणांची सुटका केली परंतु तिसरा व्यक्ती पाण्यात वाहून गेला.

हेही वाचा -

  1. lakes Overflows In Thane : मुसळधार पर्जन्यवृष्टीने तलाव ओव्हरफ्लो; ठाण्यात पूरसदृश्य परिस्थिती
  2. Heavy Rain In Vasai Virar : वसई, विरार पुन्हा एकदा जलमय; 50 कुटुंबांचे स्थलांतर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.