ETV Bharat / state

Breaking News Live : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण - Maharashtra live updates today

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Jan 30, 2023, 6:50 AM IST

Updated : Jan 30, 2023, 10:28 PM IST

22:26 January 30

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण

मुंबई - महाराष्ट्र राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच मतदारसंघात आज शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक विभागात ४९.२८ टक्के, अमरावती विभागात ४९.६७ टक्के,

औरंगाबाद विभागात ८६ टक्के, नागपूर विभागात ८६.२३ टक्के आणि कोकण विभागात ९१.०२ टक्के मतदान झाले.

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार गुरूवार दिनांक २ फेब्रुवारी २०२३ ला मतमोजणी होणार आहे, अशी माहितीही देशपांडे यांनी दिली.

21:17 January 30

आता न्यायालयात याचिका कराल तर खिशात ठेवावी लागेल रक्कम

राज्यातील प्रत्येक दुकानावर मराठी भाषेत फलक लावण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला होता. आता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंग्रजीसह मराठीत देखील फलक लावण्यात यावे अशी मागणी करणारी जनहित याचिका गुजराती विचार मंचातर्फे आज दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी करण्यापूर्वी याचिकाकर्त्यांला 1 लाख रुपये अमानत रक्कम जमा करण्याचे निर्देश प्रभारी मुख्य न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने दिले आहे.

19:28 January 30

अंधेरीतील गोखले ब्रिज गर्डरच्या डी लॉन्चिंगसाठी मेगाब्लॉक

मुंबई - अंधेरी येथील गोखले रॉड ओव्हर ब्रिजच्या गर्डरचे डी-लाँचिंग केले जात आहे. त्यासाठी 30 ते 31 जानेवारीच्या मध्यरात्री ब्लॉक कालावधी 7 तासांवरून 5 तासांवर करण्यात आला आहे. 30 रात्री 23.40 वाजल्यापासून 31 जानेवारीच्या मध्यरात्री 04.40 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

19:05 January 30

मुंबई-पुणे विद्यापीठांच्या कुलगुरु नियुक्तीसाठी राज्यापालांनी केली शोध समित्यांची स्थापना

मुंबई -राज्यपाल आणि कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी स्वतंत्र शोध समित्या स्थापन केल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी शोध समितीचे नेतृत्व माजी UGC चेअरमन डॉ. डी. पी. सिंह करणार आहेत. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी शोध समितीचे अध्यक्ष एआयसीटीईचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे असतील.

18:38 January 30

दहा वर्षापूर्वीच्या खटल्यात आसाराम लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात दोषी

गांधीनगर सत्र न्यायालयाने आसाराम यांना लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे. सुमारे १० वर्षांपूर्वी अहमदाबादच्या मोटेरा येथील आश्रमात असताना सुरतमधील एका महिलेने आसारामवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी न्यायालयाने त्यांनी दोषी ठरवले आहे. लवकरच त्यांना या प्रकरणी शिक्षा ठोठावण्यात येईल.

18:31 January 30

अबुधाबीची एक कंपनी अदानींच्या FPO मध्ये तब्बल 400 दशलक्ष डॉलरची करणार गुंतवणूक

अबू धाबी : येथील एका कंपनीने जाहीर केले की ती अदानी एंटरप्रायझेसच्या फॉलो-ऑन सार्वजनिक ऑफरमध्ये सुमारे 400 दशलक्ष अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करेल. ग्रीन ट्रान्समिशन इन्व्हेस्टमेंट होल्डिंग RSC लिमिटेड द्वारे ही गुंतवणूक केली जाणार आहे.

18:10 January 30

१५ वर्षीय मुलाचे ३२ वर्षीय विवाहितेकडून लैंगिक शोषण

ठाणे - १५ वर्षीय विद्यार्थ्याचे ३२ वर्षीय विवाहितेकडून लैंगिक शोषण झाले आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात या विवाहितेवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपास सुरू आहे.

18:07 January 30

पठाणला मनापासून दाद दिल्याबद्दल अभिनेता शाहरुखने मानले सर्वांचे आभार

मुंबई - पठाण चित्रपटाला भरघोस पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही सर्व प्रेक्षक आणि प्रसारमाध्यमांचे अत्यंत आभारी आहोत, असे अभिनेता शाहरुख खान याने म्हटले आहे. अभिनेता शाहरुख खानने माध्यमांशी संवाद साधला. काही वेळा आम्हाला लोकांना फोन करून आम्हाला आमचा चित्रपट शांतपणे प्रदर्शित करू द्या असे सांगावे लागले. चित्रपट पाहणे आणि चित्रपट निर्मिती हा प्रेमाचा अनुभव आहे आणि ज्यांनी आम्हाला पठाण लोकांसाठी प्रदर्शित करण्यात मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो, असे अभिनेता शाहरुख खान म्हणाला.

17:46 January 30

बागेश्वर धामच्या धिरेंद्रशास्त्री महाराजांविरोधात बुलढाणा शहर पोलिसात तक्रार दाखल

बुलढाणा - बागेश्वर धामचे धिरेंद्रशास्त्री महाराजांनी संत तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आता वारकरी संप्रदायातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.. संत तुकारामांना त्यांची पत्नी मारहाण करायची असा आक्षेपार्ह विधान बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री महाराजांनी केल्यानंतर आता वारकरी संघटनेकडून रोश व्यक्त केला जात आहे.. बुलढाणा जिल्ह्यात आझाद हिंद वारकरी संघटनेकडून थेट बुलढाणा शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

17:25 January 30

हिंदुत्ववादी सरकार असतानाही मोर्चाची काय गरज; ठाकरे गटाचा भाजपला टोमणा

मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सोमवारी भारतीय जनता पक्षाचा समाचार घेतला. लव्ह-जिहाद विरोधात मोर्चा काढल्याबद्दल ठाकरे गटाने भाजपवर टीका केली. तथाकथित हिंदुत्ववादी सरकार असताना अशा आंदोलनाची गरज काय, असा सवाल ठाकरे गटाने केला.

17:15 January 30

तलावाच्या पाण्यात बुडल्याने एकाचा मृत्यू, वाढदिवसाची पार्टी बेतली जिवावर

नागपूर : मोहगाव झिल्पी तलावाच्या पाण्यात बुडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. वाढदिवसाची पार्टी या तरुणाच्या जीवावर बेतली आहे. नागपूर शहरालगत असलेल्या हिंगणा तालुक्यात मोहगाव झिल्पी तलाव परिसरात काल १५ ते २० तरुण वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी गेले होते. पार्टीनंतर आशीष दिगांबर मराठे नावाचा तरुण तलावात पाय धुण्यासाठी गेला. त्याचा तोल गेल्याने तो तलावात पडला. काही क्षणात त्याचा पाण्यात बुडल्याने मृत्यू झाला आहे. घटना काल रात्री उशिरा घडल्यामुळे आशीषचा मृतदेह शोधणे शक्य नव्हते. आज सकाळी अग्निशामक दलाच्या पथकाने शोध मोहीम हाती घेतली असता दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आशिषचा मृतदेह हाती लागला.

17:10 January 30

खासदार मोहम्मद फैजल यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्याने निवडणूकही स्थगित

कोची - केरळ उच्च न्यायालयाने 25 जानेवारी, 2023 रोजी लक्षद्वीपचे माजी खासदार मोहम्मद फैजल यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यानंतर त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक भारत निवडणूक आयोगाने स्थगित केली आहे.

15:06 January 30

रणजीत पाटील यांच्यावर अमरावतीत गुन्हा दाखल; पाटील म्हणाले, काहीतरी गैरसमज झाला असेल

अकोला - अमरावती पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांच्यावर अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना डॉ. पाटील यांनी या संदर्भात आपल्याला काहीच माहित नसल्याचे आज माध्यमांशी बोलताना सांगितले. मी याबाबत माहिती घेतो, असे ते म्हणाले.

15:05 January 30

डाक विभागातील दोन कर्मचाऱ्यांवर काळाचा घाला; अपघातात दोघे ठार

लोहा - मागील कांहीं महिन्यांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात डाक विभागात नोकरीवर रुजू झालेल्या प्रशिक्षणार्थी दोघा तरुण कर्मचाऱ्यावर काळाने घाला घातला. अहेरी येथून दोघे सहकारी कर्मचारी मित्र दुचाकीवरून गडचिरोलीकडे जात असताना झालेल्या अपघातात दोघेही तरुण डाक कर्मचारी जागीच ठार झाले. मृतात लोहा शहरानजीक हळदव येथील २१ वर्षीय तरुण डाक कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

15:05 January 30

खराब हवामानामुळे मुख्यमंत्री शिंदे, DyCM फडणवीस यांना घेऊन जाणारे विमान मुंबईला परतले

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेऊन जाणारे विमान खराब हवामानामुळे जळगावला लँड न होताच परत मुंबईला पोहचले, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील एका अधिकाऱ्याने दिली. शिंदे आणि फडणवीस एका कार्यक्रमासाठी जळगाव जिल्ह्यातील जामनेरला निघाले होते.

14:55 January 30

पाकिस्तानातील पेशावरमध्ये मशिदीत आत्मघातकी स्फोट, किमान 50 जखमी

पेशावर (पाकिस्तान) - पोलीस लाइन्स भागात असलेल्या मशिदीमध्ये नमाजाच्या वेळी एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वत:ला उडवून दिले. यामध्ये किमान 50 लोक जखमी झाले आहेत. जिओ न्यूजने ही बातमी दिली आहे.

14:40 January 30

मराठवाडा शिक्षक मतदार संघ 2 वाजेपर्यंत 58.27 टक्के मतदान

औरंगाबाद - मराठवाडा शिक्षक मतदार संघ निवडणूक मतदान जोरात सुरू आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत जवळपास 58.27 टक्के मतदान झाले आहे.

14:18 January 30

पाकिस्तानच्या पेशावरमधील मशिदीत स्फोट, अनेक जण जखमी

पाकिस्तानच्या पेशावरमधील मशिदीत स्फोट झाला आहे. या स्फोटात अनेक जण जखमी ढासे आहेत.

14:03 January 30

ज्याला तुम्ही कश्मीरियत म्हणता, त्याला मी माझे घर म्हणतो-राहुल गांधी

अनेक महिलांनी मला सांगितले की त्यांच्यावर बलात्कार झाला आहे, विनयभंग झाला आहे, त्यांच्या काही नातेवाईकांनी त्यांचा विनयभंग केला आहे. पोलिसांना सांगू असे मी त्यांना सांगितल्यावर त्यांनी मला परवानगी दिली नाही. त्यांनी मला सांगितले की पोलिसांना सांगितल्याने त्यांची परिस्थिती गुंतागुंतीची होऊ शकते. ज्याला तुम्ही कश्मीरियत म्हणता, त्याला मी माझे घर म्हणतो. माझे पूर्वज जेव्हा येथून गंगेच्या काठावर राहायला गेले, तेव्हा त्यांनी काश्मिरियतचा हाच संदेश उत्तर प्रदेशात पसरवला. माझ्या कुटुंबाने हाच संदेश गंगेत पसरवला. सुरक्षा लोकांनी मला सांगितले की तुम्ही देशाच्या कोणत्याही भागात, जम्मूमध्ये फिरू शकता... पण काश्मीरमध्ये गेल्या चार दिवसांपासून तुम्ही वाहनानेच जावे लागेल. मला सुरक्षा दल, सीआरपीएफ जवान, बीएसएफ आणि आर्मीचे लोक आणि काश्मीरच्या तरुणांना सांगायचे आहे, "मला हिंसा समजली आहे, मी ती सहन केली आहे. ज्यांनी ती पाहिली नाही, ते मोदीजी, अमित शाह आणि आरएसएस सारखे समजू शकत नाहीत. माझ्या कुटुंबाने मला शिकवले आहे, गांधीजींनी मला शिकवले आहे की जर जगायचे असेल तर सन्मानाने जगले पाहिजे.

13:49 January 30

खंबाटकी बोगद्यात कारचा भीषण अपघात, दोन ठार, पाच जखमी

सातारा - साताऱ्याच्या खंबाटकी बोगद्यात कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन जण ठार तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दीड वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. गोकर्ण महाबळेश्वरची ट्रीप संपवून पुन्हा पुण्याला जात असताना हा अपघात झाला आहे. चालकाला डुलकी लागल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी रस्त्यावरील कठड्याला धडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

13:48 January 30

ठाण्यातील कळवा नाका येथे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात बॅनर बाजी

ठाण्यातील कळवा नाका येथे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात बॅनर बाजी करण्यात आली आहे. काल कळव्यातील समाजसेवक रवींद्र पोखरकर यांनी लावलेल्या बॅनरला आज कळव्यातील नागरिक नरेंद्र शिंदे यांनी लबाड बोका ढोंग करतय अश्या आशयाचे लावले बॅनर लावले आहे. ठाण्यात शिंदे विरुद्ध आव्हाड असा बॅनर वॉर पहायला मिळत आहे. तर आगामी निवणुका पाहता कळवा मुंब्रातील सत्ता मिळवण्यासाठी बॅनर वॉर सुरु असल्याचे नागरिकांचे मत आहे.

13:44 January 30

जम्मू काश्मीरच्या लोकांनी मला हँड ग्रेनेड नाही, तर प्रेम दिले-राहुल गांधी

काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले, की चार मुले माझ्याकडे आली. ते भिकारी होते आणि त्यांच्या अंगावर कपडे नव्हते... मी त्यांना मिठी मारली... ते थंड आणि थरथर कापत होते. कदाचित त्यांच्याकडे अन्न नसेल. मला वाटले की जर ते मी जॅकेट किंवा स्वेटर घालत नाही, मीही ते घालू नये. जम्मू काश्मीरच्या लोकांनी मला हँड ग्रेनेड नाही तर प्रेम दिल्याचेही ते भारत जोडो यात्रेच्या जम्मू काश्मीरमधील समारोपात म्हणाले.

13:32 January 30

खासदार नवनीत राणा यांचे वडील फरार म्हणून घोषित

खासदार नवनीत राणा जात पडताळणी प्रकरणात शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना दणका दिला आहे. नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंग कौर फरार म्हणून शिवडी कोर्टाकडून घोषित करण्यात आले आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना ठोठावला 1 हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयात आणि मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेले प्रकरण दोन्हीही वेगवेगळे शिवडी कोर्टाचे निरीक्षण

13:01 January 30

नागपूर विभागातील ६ जिल्ह्यांमध्ये सरासरी १३.५७ टक्के मतदान

विधानपरिषद नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक

निवडणूक अधिकारी तथा नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार

सकाळी १०.०० वाजेपर्यंत विभागातील ६ जिल्ह्यांमध्ये सरासरी १३.५७ टक्के मतदान झाले आहे.

जिल्हा निहाय मतदानाची आकडेवारी

नागपूर : ११.९४ टक्के

वर्धा : १५.४९ टक्के

चंद्रपूर :. १७.२९ टक्के

भंडारा :. १३.१२ टक्के

गोंदिया :. ११.८३ टक्के

( उपरोक्त जिल्ह्यांमध्ये सकाळी ८ वाजता पासून मतदानास सुरूवात झाली आहे)

*गडचिरोली* : १२.८६ (सकाळी ९.०० वाजे पर्यंत)

12:23 January 30

मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय विमानात पुन्हा बिघाड

मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय विमानात पुन्हा बिघाड झाला आहे. तांत्रिक बिघाडामुळे मुख्यमंत्र्या शिंदे यांचा दौरा खोळंबला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यापूर्वी विमानात बिघाड झाला आहे.

12:21 January 30

बहुचर्चित डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील सीबीआयचा तपास पूर्ण

बहुचर्चित डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील सीबीआयचा तपास पूर्ण झाला आहे. नव्या तपास अधिकाऱ्यांनी दिल्ली मुख्यालयात अहवाल सादर केला आहे. 32 पैकी 15 साक्षीदारांची खटल्यातील साक्षही पूर्ण झाल्याचे सीबीआयने म्हटले आहे. या अहवालावर सीबीआय तीन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करणार आहे. सीबीआयच्या भूमिकेनंतर मुंबई उच्च न्यायालय निर्देश जाहीर करणार आहे.

11:34 January 30

जैन पुजार्‍याच्या वेशात मंदिरातून १६० ग्रॅम सोन्याचे चोरले ताट

२३ जानेवारी रोजी जैन पुजार्‍याच्या वेशात भरत सुखराज दोशी या व्यक्तीने जैन मंदिरातून १६० ग्रॅम सोन्याचे ताट चोरले. १०० सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्याला मालाड पश्चिम येथून पकडण्यात आले. सोने जप्त करण्यात आले. क्राईम पेट्रोल पाहिल्यानंतर त्याने हे नियोजन केले, पोलीस निरीक्षक डी कवडे यांनी सांगितले.

11:04 January 30

पदवीधर शिक्षक निवडणुकीत सकाळी १० वाजेपर्यंत किती झाले मतदान?

नागपूर विभागात 10 वाजेपर्यंत 13.54 टक्के मतदान झाले आहे. तर औरंगाबाद विभागात 11.14 टक्के मतदान झाले आहे

10:23 January 30

कालचा मोर्चा मोदींविरोधात काढला की काय असा लोकांमध्ये गैरसमज-संजय राऊत

सकल हिंदू समाजाच्या आंदोलनावरून खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. हिंदू आक्रोश पाहायचे असल्यास काश्मीरमध्ये जा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. शिवरायांच्या अवमानावेळी शिंदे गट आणि भाजपचे तोंडे गप्प का होते, असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.

09:49 January 30

शेअर बाजारात सकाळच्या सत्रात 555.15 अंशांची घसरण

शेअर बाजारात सकाळच्या सत्रात 555.15 अंंशाने घसरून निर्देशांक 58,775.75 वर पोहोचला आहे.

08:59 January 30

पठाण सिनेमाचे पोस्टर फाडून दगडफेक करणाऱ्या ९ जण ताब्यात

पठाण सिनेमा मॅक्सस मॉलमध्ये प्रदर्शित होत आहे. बजरंग दलाच्या सुमारे 15-20 कार्यकर्त्यांनी बॉक्स ऑफिसवर जाऊन घोषणाबाजी केली, पोस्टर फाडले आणि दगडफेक केली. 9 जणांना ताब्यात घेतले. एफआयआर नोंदवून पुढील कार्यवाही सुरू असल्याचे भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पीआय मुकुंद पाटील यांनी सांगितले.

08:55 January 30

अमरावती पदवीधर मतदार संघाच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात

अमरावती पदवीधर मतदार संघाच्या मतदान प्रक्रियेला आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत 23 उमेदवार उभे आहेत. दरम्यान, अकोल्यात 61 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे.

07:27 January 30

अमेरिकन डीजे डिप्लो, रॉक बँड 'द स्ट्रोक्स'ने 'लोल्लापलूझा' फेस्टच्या समारोपाच्या दिवशी प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध

अमेरिकन डीजे डिप्लो, रॉक बँड 'द स्ट्रोक्स' आणि भारतीय रॅपर 'डिव्हाईन' यांनी रविवारी येथे 'लोल्लापलूझा' या जागतिक संगीत महोत्सवाच्या अंतिम दिवशी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले 'द स्ट्रोक्स'ने 'लास्ट नाईट' सारखी त्यांची सदाबहार गाणी सादर केली. मी काल रात्री 'पठाण' पाहिला आणि मी खूप प्रेरित झालो", रॉक बँडचे मुख्य गायक ज्युलियन कॅसाब्लांकास यांनी स्टेजवर असताना सांगितले.

07:01 January 30

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी नदिम जहावी यांची केली हकालपट्टी

यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे अध्यक्ष नदिम जहावी यांना पदावरून हटवले. नदिम जहावी हे करप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

07:01 January 30

शारजाह ते कोची या फ्लाइटमध्ये हायड्रॉलिक बिघाड

शारजाह ते कोची या फ्लाइटच्या हायड्रॉलिक बिघाडानंतर संपूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

07:01 January 30

बनावट बातम्यांवर रोख लावण्यासाठी जपानने घेतला मोठा निर्णय

बनावट बातम्यांचा सामना करण्यासाठी जपान नवीन एजन्सी तयार करणार आहे.

06:38 January 30

Maharashtra Breaking News : तळोजा एमआयडीसीमध्ये प्रणव वूड्स कंपनीला भीषण आग

मुंबई : नवी मुंबई परिसरातील तळोजा औद्योगिक वसाहतीतील प्रणव वूड्स या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे. लाकडीप्लेट्स बनवण्याची कंपनी असल्याने आगीने आणखी भडका घेतला आहे. आगीचे नेमकं कारण समजले नसले तरीही शॉक सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Last Updated : Jan 30, 2023, 10:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.