ETV Bharat / state

महाराष्ट्र कोरोना अपडेट : राज्यात ६, १८५ नवीन रुग्णांचे निदान, ८५ मृत्यू

राज्यात आज ६, १८५ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर कोरोनाग्रस्तांचा आकडा १८, ०८, ५५०वर पोहोचला आहे. ४, ०८९ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून आजपर्यंत एकूण १६, ७२, ६२७ बाधित बरे होऊन घरी गेले आहेत.

महाराष्ट्र कोरोना
महाराष्ट्र कोरोना
author img

By

Published : Nov 27, 2020, 7:57 PM IST

मुंबई - राज्यभरात आज राज्यात ६, १८५ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १८, ०८, ५५०वर पोहोचला आहे. राज्यात आज ८५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४६, ८९८ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५९ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ८७, ९६९ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

८७, ९६९ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण

राज्यात आज ४, ०८९ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून आजपर्यंत एकूण १६, ७२, ६२७ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४८ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज ८५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १, ०६, ३५, ६०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८, ०८, ५५० नमुने म्हणजेच १७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५, २८, ३९५ व्यक्ती होम क्वारंटाइन तर ७, २४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज एकूण ८७, ९६९ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

कधी किती रुग्ण आढळले?

राज्यात जून दरम्यान दिवसाला ५, ४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५००वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४००वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८००वर गेली होती. मात्र ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७, ०८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८, ५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५, ९८४ रुग्णांची, २६ ऑक्टोबरला ३, ६४५, ७ नोव्हेंबरला ३, ९५९, १० नोव्हेंबरला ३, ७९१, १५ नोव्हेंबरला २, ५४४, १६ नोव्हेंबरला २, ५३५, १७ नोव्हेंबरला २, ८४०, २० नोव्हेंबरला ५, ६४०, तर २१ नोव्हेंबरला ५, ७६० रुग्ण आढळून आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.