ETV Bharat / state

Cabinet Meeting Today : मराठा आणि ओबीसी आरक्षण वाद सुटेना; आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यावर होणार चर्चा, वाचा सविस्तर - ओबीसी आरक्षण वाद

Cabinet Meeting Today : मराठा आरक्षणावरुन राज्य सरकार चांगलचं अडचणीत आलं आहे. त्यातच आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुनही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या मंत्रिमंडळाची बैठक वादळी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Cabinet Meeting Today
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2023, 12:57 PM IST

मुंबई Cabinet Meeting Today : मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन राज्यात मोठा गदारोळ सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी बैठक होत आहे. या बैठकीत मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांना विरोध केला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र ( Maratha Reservation ) दिल्यास सरकार जाईल, असा थेट इशारा दिला आहे. तर मंत्री शंभुराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळांवर टीका केली आहे. त्यामुळे आजची मंत्रिमंडळाची बैठक वादळी ठरणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

मराठा आरक्षणावरुन दोन मंत्री आमने-सामने : मनोज जरांगे-पाटील यांनी जालन्यात दोन टप्प्यात उपोषण केलं. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला आरक्षणावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही, ते घटनाबाह्य ठरेल असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. ओबीसीतून आरक्षण दिल्यास सरकार जाईल, असा इशारा सरकारमधीलच मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी दिला आहे. यानंतर पत्रकार परिषद घेऊन मंत्री शंभूराज देसाई यांनी भुजबळांवर टीका केली. छगन भुजबळांनी संभ्रम निर्माण करणारं वक्तव्य करू नये, असं स्पष्ट केलं होतं. यानंतर सरकारमध्येच समन्वय नसल्याचं दिसून आलं आहे. या सर्व घडामोडीनंतर आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी बैठक होत आहे. या बैठकीत या वादावर देखील चर्चा होणार आहे.

बैठकीत येणार कोणते मुद्दे ? : राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी समाज हे दोन्ही समाज आरक्षणावरून एकमेकांविरोधात वक्तव्य करत आहेत. मराठा समाजाला जर कुणबी प्रमाणपत्र मिळणार असेल, तर दिवाळीनंतर आपण आंदोलन करणार, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. धारावी पुनर्बांधणी प्रकल्प, तसेच कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, एअर इंडियाची इमारत राज्य सरकार खरेदी करणार, धनगर समाजासाठी समिती, तसचं मराठा आरक्षणाबाबतही चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सरकारचा आनंदाचा शिधा पोहोचलाच नाही : दिवाळी जवळ येवून ठेपली असताना अजून सरकारकडून देण्यात येणारा 'आनंदाची शिधा' पूर्ण वाटप झाला नाही. राज्यातील काही ठिकाणीच 'आनंदाचा शिधा' पोहचला आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये नाराजी आहे. यावरदेखील आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच या बैठकीतून आणखी कोणते महत्त्वाचे निर्णय होतात, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. MH gov first meeting on OBC : ओबीसी आरक्षणाच्या 'त्या' प्रश्नावरून अजित पवार - छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी?
  2. Manoj Jarange On OBC : 'ओबीसीमध्ये यायचं असेल तर...', नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील, वाचा सविस्तर
  3. OBC Reservation : ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी, काय आहे याचिका?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.