ETV Bharat / state

Bacchu Kadu On Cabinet Expansion : 2024 पर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त नाही; आमदार बच्चू कडू - राज्य मंत्रिमंडळ विस्तार

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet expansion) लवकरच होणार अशा चर्चा रंगत असल्या तरी अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu On Cabinet Expansion) यांनी यासंदर्भात मोठे विधान केले आहे. या सरकारकडून मंत्रिमंडळ विस्ताराच्या अपेक्षा नाहीत. 2024 पर्यंत काही होणार नाही, असे नाराज उद्‌गार कडू यांनी मुंबईत ईटीव्ही भारतशी (Bacchu Kadu Interview to Etv) बोलताना काढले. (Latest news from Mumbai)

Bacchu Kadu On Cabinet Expansion
आमदार बच्चू कडू यांची मुलाखत
author img

By

Published : Jan 9, 2023, 6:32 PM IST

Updated : Jan 9, 2023, 7:26 PM IST

बच्चू कडू मुलाखत

मुंबई : प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारा (Maharashtra Cabinet expansion) संदर्भात मोठे विधान केले आहे. (Bacchu Kadu On Cabinet Expansion) शिंदे फडणवीस सरकारने पहिल्यांदाच अपंग मंत्रालयाची निर्मिती केली आहे. अपंगांसाठी अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अपंगांच्या विविध प्रश्नावर काम केले आहे. तसेच त्यांची संघटना ही बांधली आहे. त्यामुळे या मंत्रालयाचा कार्यभार आपसूकच बच्चू कडू यांच्याकडे सोपवला जाणार अशी, (Bacchu Kadu Interview to Etv) अटकळ होती. (Latest news from Mumbai)

अपंग मंत्रालयाला प्रधान सचिव : या संदर्भात बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की अपंग मंत्रालय सरकारने निर्मिती केली आहे त्यासाठी आता प्रधान सचिव आणि काही पदांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे लवकरच कामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. राज्य सरकार अपंगांच्या बाबतीत नक्कीच काही चांगले निर्णय या मंत्रालयाच्या माध्यमातून येईल अशी आम्ही सर्वजण अपेक्षा करीत आहोत.

मंत्रिमंडळाचा विस्तार 2024 पर्यंत नाही : दरम्यान अपंग मंत्रालयाचे पहिले मंत्री म्हणून आपली नियुक्ती होण्याची शक्यता होती या संदर्भात विचारताच बच्चू कडू म्हणाले की, या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 2024 पर्यंत होईल याची शाश्वती नाही त्यामुळे आम्ही सर्व आमदारांना सांगितले आहे जास्त आशा अपेक्षा न ठेवता आपापल्या मतदारसंघातील कामे करायला लागा. आता जे काही होईल ते 2024 मध्येच असे उद्विग्न उदगारही बच्चू कडू यांनी यावेळी काढले.

पाचही मतदारसंघात उमेदवार : शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या पाच जागांची निवडणूक होत आहे आपण सत्तेमध्ये सहभागी असताना आपले स्वतंत्र उमेदवार उभे करीत आहात. याबद्दल विचारताच बच्चू कडू म्हणाले की यापूर्वी सुद्धा मी ग्रामपंचायत आणि नगरपालिकांमध्ये माझे स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. सरकार म्हणून आम्ही जरी एकत्र असलो तरी माझ्या पक्षातर्फे मी निश्चितच उमेदवार उभे करणार आहे. मी पाचही मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार असल्याचे यापूर्वी जाहीर केले आहे. मी सरकारसोबत नाही असा याचा अर्थ होत नाही; पण आम्हाला उमेदवार देणे भाग आहे असेही ते म्हणाले.

भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना एकत्र लढणार : दरम्यान यासंदर्भात भाजपाचे नेते आणि सहकार मंत्री अतुल सावे यांना विचारले असता ते म्हणाले की, भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढवणार आहेत. हे नक्की बच्चू कडू हे जरी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असले तरी ते आमच्या सोबत आहेत, असे संकेतही सावे यांनी यावेळी दिले.

Last Updated : Jan 9, 2023, 7:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.