ETV Bharat / state

Mahadev Betting App Case : महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरण; अभिनेता साहिल खानसह उद्योगपती मोहित बर्मनवर गुन्हा दाखल - खिलाडी अ‍ॅप

Mahadev Betting App Case : महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणात अभिनेता साहिल खानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल खानसह मोहित बर्मनवर यांच्यावरदेखील गुन्हा दाखल केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे.

Mahadev Betting App Case
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2023, 8:50 AM IST

Updated : Nov 14, 2023, 9:34 AM IST

मुंबई Mahadev Betting App Case : महादेव अ‍ॅप सट्टेबाजी घोटाळ्यात स्टायलिश अभिनेता साहिल खानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासह मोहित बर्मन आणि गौरव बर्मन यांचा 15 हजार कोटींच्या घोटाळ्यात सहभाग असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे उद्योग जगतात खळबळ उडाली आहे. ईडीनं 2018 मध्ये प्रदीप बर्मन यांची 20 कोटी 87 लाखांची संपत्ती जप्त केली.

साहिल खान, मोहित बर्मनसह 32 आरोपींची नावं : न्यायालयाच्या आदेशानुसार माटुंगा पोलिसांनी तक्रारदार प्रकाश बनकर यांचा जबाब घेऊन एफआयआर नोंदवला आहे. महादेव अ‍ॅपची उपकंपनी असलेल्या खिलाडी अ‍ॅपच्या प्रवर्तकासह उद्योगपती मोहित बर्मन आणि गौरव बर्मन यांच्यासह 32 आरोपींची नावं या गुन्ह्यात समाविष्ट आहेत. आरोपी क्रमांक 32 वर "इतर अज्ञात व्यक्ती" असं नमूद करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या म्हणण्यानुसार, यामुळे देशातील इतर प्रमुख व्यक्तींची चौकशी करण्याची व्याप्ती वाढणार आहे. सध्या छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान बेटिंग घोटाळ्यानं लक्ष वेधलं आहे. महादेव अ‍ॅप घोटाळ्यातील कथित सहभागावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बघेल यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.

अभिनेता रणबीर कपूर, श्रद्धा कपूर आणि हुमा कुरेशींची झाली चौकशी : कुर्ला न्यायालयाच्या निर्देशानुसार खिलाडी अ‍ॅप विरोधात 7 नोव्हेंबरला माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. "2019 पासून ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप्सद्वारे आतापर्यंत अंदाजे 15 हजार कोटींची फसवणूक करण्यात आली आहे, असा या एफआयआरमध्ये माटुंग्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी आरोप केला होता. अंमलबजावणी संचालनालयानं आरोपपत्रात 14 जणांची नावं दिली आहेत. यात कथित अ‍ॅप प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल आणि इतर आरोपी विकास छपरिया, चंद्रभूषण वर्मा, सतीश चंद्राकर, अनिल दममानी, सुनील दममानी, विशाल आहुजा आणि धीरज आहुजा यांचा समावेश आहे. बॉलीवूड अभिनेते रणबीर कपूर, श्रद्धा कपूर आणि हुमा कुरेशी यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. एफआयआरमध्ये गौरव आणि मोहित बर्मन यांची नावं आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांची चौकशी केली जाईल, असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.

मॅच फिक्सिंगमध्ये बजावली भूमीका : एफआयआरमध्ये मुंबईस्थित आरोपी मोहित बर्मन, दिनेश खंभाट, रोहित कुमार, मुर्गाई आणि गौरव बर्मन यांच्यात संबंध असल्याचं सिद्ध झालं आहे. ते थेट क्रिकेट लीगमध्ये सहभागी होणाऱ्या संघटनांमध्ये थेट इक्विटी खरेदी केलेली आहे. त्यांच्या सहकाऱ्यांद्वारे, ते प्लेअर बुकिंग वेबसाइट नियंत्रित आणि ऑपरेट करतात, असा आरोप आहे. लीगमधील क्रिकेट सामन्यांमध्ये मॅच फिक्सिंगच्या गुन्हेगारीत गुंतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मोहित हे डाबर इंडिया लिमिटेडचे चेअरमन आहेत. एफआयआरमध्ये असेही नमूद केलं आहे, की आरोपी सौरभ चंद्राकर हे अनेक प्रभावशाली व्यक्तींशी आणि काँग्रेसशी संबंधित राजकीय नेत्यांशी संबंधित आहेत. चंद्राकर यांनी मॅच फिक्सिंगमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे बर्मन यांच्या भूमिकेची चौकशी केली जाईल, असा उल्लेख आहे.

सामाजिक कार्यकर्त्यानं काय केला आहे आरोप : बनकर या सामाजिक कार्यकर्त्यानं आरोप केला आहे की, चंद्राकर आणि लंडनमध्ये राहणारे त्यांचे जवळचे सहकारी दिनेश खंभट आणि चंदर अग्रवाल हे भारतात मॅच फिक्सर म्हणून ओळखले जातात. बहुतेक सामन्यांचे निकाल फेरफार आणि ठरवले गेल्याचा आरोपही यावेळी करण्यात आले. एफआयआरनुसार, तक्रारदारानं असं म्हटलं आहे की, "त्याला विश्वासार्ह सूत्रांकडून समजलं की, सखोल तपास केल्यास आणखी एक आरोपी चंदर अग्रवाल हा क्रिकेट लीगमध्ये सामील होता. त्यानं यापूर्वीच्या आणि चालू असलेल्या मॅच फिक्सिंगमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भूमिका बजावली असल्याचं स्पष्ट होईल.

चंद्राकर आणि रवी उप्पल हे या गुन्ह्याचे सूत्रधार : एफआयआरनुसार, चंद्राकरनं त्याचे बिटकॉइन वॉलेट पैसे प्राप्त करण्यासाठी वापरलं. सध्या, त्याच्या बिटकॉइन वॉलेटमध्ये 2 लाख 078,318.38 डॉलर आहेत. भारतीय चलनात 17.3 कोटी इतकी रक्कम होती. बिटकॉईन व्यतिरिक्त, चंद्राकरकडं 26,224,576 डॉलरचे इथेरियम कॉईन वॉलेट होते, ज्याची भारतीय रुपयात 218 कोटी किंमत आहे. एफआयआरमध्ये चंद्राकर आणि रवी उप्पल हे या अ‍ॅपमागील सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, मुंबई, कोलकाता आणि छत्तीसगड इथं 32 सिंडिकेट ऑपरेटीव्ह, संपूर्ण सट्टेबाजी व्यवसाय, मॅच फिक्सिंग, करोडोंमध्ये होणारी कमाई क्रिप्टो करन्सीमध्ये रुपांतरित करत आहेत.

मुंबई पोलिसांनी 7 नोव्हेंबरला केला गुन्हा नोंद- मुंबई पोलिसांनी 7 नोव्हेंबर रोजी महादेव बुक अ‍ॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर, रवी उप्पल आणि शुभम सोनी या 31 जणांविरुद्ध फसवणूक आणि जुगाराच्या विविध कलमांखाली एफआयआर दाखल केला होता. यामध्ये 31 जणांविरुद्ध एफआयआर आहे, तर 32 क्रमांक अनोळखी लोकांविरुद्ध आहे. आता या प्रकरणाची एफआयआर प्रत बाहेर आल्यानं खळबळजनक माहिती उघडकीस येऊ लागली आहे. त्यानुसार या एफआयआरमध्ये अभिनेता साहिल खानचंही नाव आहे. या एफआयआरमध्ये आरोपी क्रमांक 26 म्हणून अभिनेता साहिल खानचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा :

  1. Pravin Darekar On Bhupesh Baghel : भूपेश बघेल यांच्या सट्टेबाजांशी असलेल्या कनेक्शनचे काँग्रेसने उत्तर द्यावे; दरेकर यांचा सवाल
  2. ED Raid on Bollywood Production : महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी बॉलिवूड प्रॉडक्शन हाऊसमध्ये ईडीची मोठी छापेमारी; बॉलिवूड विश्वात खळबळ

Last Updated : Nov 14, 2023, 9:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.