मुंबई: मुंबईत गेल्या महिनाभरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना आणि ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळा असे आवाहन केले जात आहे. लग्न मोठे कार्यक्रम यात नियम पाळले जात नाहीत. मुख्यमंत्र्यानी मोठे उत्सव टाळा असं सांगितलं आहे. मात्र त्याकडे राजकीय लोकांकडून दुर्लक्ष होत आहे. मुंबईत रुग्ण संख्या वाढत आहे यामुळे शाळा बंद केल्या आहेत असे महापौर म्हणाल्या.
तर मुंबईत लॉकडाऊन
मुंबईत रुग्ण संख्या वाढत असल्याने पालिका सज्ज असल्याचे आयुक्त सांगत आहेत. पालीकेने सर्व तयारी केली आहे. कोणालाही लॉकडाऊन नको आहे. नागरिकांनी नियम पाळायला हवेत. 20 टक्के रुग्ण आढळलेल्या इमारती आता सील होणार आहेत. तसेच रुग्णसंख्य 20 हजारावर गेली तर लॉकडाऊन लावावा लागेल. मुख्यमंत्री एक दोन दिवसात यावर बोलतील असे महापौरांनी सांगितले.
हेही वाचा : Omicron Testing Kit : ओमीक्रॉनच्या निदानासाठी टाटा मेडिकलने तयार केली टेस्टिंग किट; ICMR ची मान्यता