मुंबई - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ६०० च्या वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देश लॉकडाऊन केल्यानंतर सर्व मेल, एक्सप्रेस आणि उपनगरीय लोकल सेवाही आता १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी सुरुवातील ३१ मार्चपर्यंत रेल्वेसेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता भारतात कोरोना विषाणूचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश २१ दिवस लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. त्यानुसार भारतीय रेल्वे मंत्रालयाने आज पत्रक काढून सर्व मेल, एक्सप्रेस, उपनगरीय गाड्या, मेट्रो कलकत्ता या १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याचे जाहीर केले. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकल सेवा इतके दिवस बंद राहणार आहे.