जून महिन्याच्या मध्यापर्यंत दडी मारलेल्या पावसाने जोरदार कमबॅक केले आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाचा कहर पहायला मिळत आहे. मुंबई व उपनागरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
- मुंबईतील मालाडमध्ये संरक्षक भिंत कोसळून २० जणांचा मृत्यू
मुंबई - पश्चिम उपनगरातील मालाड येथे भिंत कोसळून २० जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री मुसळधार पाऊस सुरू असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दुर्घटनेत मोठ्या संख्येने रहिवाशी जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वाचा सविस्तर
- सीएसएमटी-कुर्ला ठप्प, कुर्ला-अंबरनाथ पहिली लोकल धावली
मुंबई - गेल्या चार दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाने मुंबईची अक्षरशः तुंबई केली आहे. याचा परिणाम उपनगरीय रेल्वेवर झाला आहे. सीएसटी-ठाणे आणि सीएसटी-वाशीपर्यंतची लोकल सेवा पुर्णतः ठप्प झाली आहे. सायन-माटुंगा-कुर्लादरम्यान ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने पुढील सुचना मिळेपर्यंत या मार्गावर एकही लोकल धावणार नसल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. तसेच शासनाकडून मुंबईत आठवडाभरासाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. वाचा सविस्तर
- घातवार :मुंबई-पुण्यात भिंत, नाशकात टाकी कोसळली; ३० जणांचा मृत्यू
मुंबई - राज्यात मंगळवार नागरिकांसाठी घातवार ठरला. मुंबईतील मालाड भागात भिंत कोसळून १८ जण ठार झाले. तर, कल्याणमध्ये भिंत कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला. शनिवारीच पुण्यातल्या कोंढवा भागात भिंत कोसळून १५ मजुरांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. आंबेगांव सिंहगड येथील कँम्पसमध्ये सिमाभिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच नाशकात निर्माणाधीन पाण्याची टाकी कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला तर, २ जखमी झाले आहेत. वाचा सविस्तर
नागोठण्यात अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली; तर रोह्यात कोसळली दरड
रायगड - जिल्ह्यात रात्री पासून काही भागात पावसाने उसंत घेतली असली तरी नागोठणे, रोहा, सुधागड पाली, महाड, श्रीवर्धन या दक्षिण भागात पाऊस रात्रभर पडत होता. नागोठणेमधील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पाणी बाजरात घुसले आहे. तर पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाचा सविस्तर
मुंबई विमानतळावर विमान घसरले; ५४ विमानांचे मार्ग वळवले, ५२ उड्डाणे रद्द
मुंबई - रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे मुंबई विमानतळावर मोठा अपघात होता होता टळला. मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावरील रनवेवर स्पाईस जेटच्या विमान क्रमांक ६२३७ हे विमान घसरल्याने मुंबई विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या विमानातून १६७ प्रवासी प्रवास करत होते. या घटनेत सर्व प्रवासी सुखरूप आहेत. वाचा सविस्तर
कल्याणमध्ये नॅशनल उर्दू हायस्कुलची संरक्षण भिंत कोसळून ३ जणांचा मृत्यू
ठाणे - कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी किल्ला समोर असलेल्या नॅशनल उर्दू हायस्कूलची संरक्षण भिंत कोसळून लगतच्या झोपड्यांवर पडल्याने या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मृतांमध्ये मध्ये २ महिला आणि एक ३ वर्षीय मुलाचा समावेश आहे. वाचा सविस्तर
चांदीवलीत जमीन खचली, जवळच्या इमारतीना धोका
मुंबई - सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नागरिकांची दाणादाण उडवली आहे. मुंबईच्या काही परिसरातील सखोल भागांमध्ये पाणी साचल्याने कामानिमित्त आलेल्या नागरिकांना त्रास होत आहे. किंग सर्कलमध्ये दरवर्षी पावसाळ्यात अशी परिस्थिती निर्माण होते, असे नागरिकांनी म्हटले आहे. तर, बाहेर गावातून कामासाठी मुंबईत आलेल्या कर्मचाऱ्यांचेही यामुळे हाल होत आहेत. वाचा सविस्तर
नाशकात पाण्याची टाकी कोसळून ३ ठार; ३ गंभीर
नाशिक - गंगापूर रोड येथील धृवनगर परिसरात आपना घर या बांधकाम प्रकल्पात आज सकाळी साडेआठ वाजता सुमारास पंधरा हजार लिटर क्षमतेची वीस फूट उंचीची जलकुंभ अचानकपणे कोसळले. यात तीन मजुरांचा जागीच मृत्यू झालाय तर तिघे गंभीरपणे गंभीर जखमी झाले आहे. वाचा सविस्तर
पुण्यात जोरदार पावसाची शक्यता; नागरिकांना बाहेर न पडण्याचे पालिकेचे आवाहन
पुणे - शहर आणि परिसरात येत्या काही तासांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यते नंतर पुणे महापालिकेने नागरिकांना सावधानतेचा इशारा देत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.वाचा सविस्तर
मुंबईतील मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका; तीन गाड्या रद्द
रत्नागिरी - मुंबई मुसळधार पावसाने तुंबली आहे. मात्र, त्याचे पडसाद कोकणात पाहायला मिळाले. चाकरमान्यांची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकण रेल्वेला याचा फटका बसला आहे. वाचा सविस्तर