ETV Bharat / state

आता मिटणार मुंबईतील प्रवासी-टॅक्सीचालक वाद, परिवहन विभागाने लढविली अनोखी शक्कल - मुंबई परिवहन विभाग

टॅक्सीवर दोन रंगांचे दिवे लावले जातील. त्यामुळे प्रवाशांसाठी टॅक्सी उपलब्ध आहे की नाही, याची माहिती दिली जाईल. यासाठी ठराविक दोन रंग असतील. त्याचे नियम परिवहन विभाग जाहीर करणार आहे. टॅक्सीमध्ये प्रवासी नसताना चालक टॅक्सी व्यस्त आहे, असे दाखवू शकणार नाही. कारण, हे दिवे टॅक्सीच्या मीटरला जोडलेले असतील.

taxi
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Dec 11, 2019, 7:39 PM IST

मुंबई - शहरात टॅक्सीचालक आणि प्रवाशांमधील सतत होणारे वाद टाळण्यासाठी परिवहन विभागाने टॅक्सीवर दिवे लावण्याचा तोडगा काढला आहे. हे दिवे टॅक्सीची व्यस्तता दर्शवतील. ज्यामुळे टॅक्सी प्रवासाठी उपलब्ध आहे की नाही, हे प्रवशांना टॅक्सी थांबवण्याआधीच कळणार आहे.

टॅक्सीचालक आणि प्रवाशांमधील वाद टाळण्यासाठी मुंबई परिवहन विभागाची अनोखी शक्कल

ही पद्धत बाहेरील देशांमध्ये आगोदरच वापरली जाते. आपल्याकडे यापूर्वी टॅक्सीच्या बोनेटवर साधे मीटर होते. हे मीटर अप असल्यास टॅक्सी प्रवाशांसाठी उपलब्ध आहे; तर टॅक्सीचा मीटर डाऊन असल्यावर टॅक्सीत प्रवासी आहेत, अशी माहिती मिळत होती. मात्र, कालांतराने शहरातील सर्व टॅक्सींमध्ये इलेक्ट्रॉनिक मीटर लावण्यात आले. हे मीटर टॅक्सीच्या आतमध्ये बसवल्याने बाहेरील प्रवाशाला टॅक्सीची उपलब्धता कळत नाही. याचाच गैरफायदा घेत काही टॅक्सी चालक सर्रासपण भाडे नाकारत होते. दिवे बसवल्याने याला आळा बसेल. भारतात प्रथमच हा प्रयोग मुंबईत केला जाणार आहे. सर्व टॅक्सी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, टॅक्सीवर बसवण्यात येणारे दिवे प्रशासनाच्या खर्चातून बसवले जावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा - पारंपारिक टॅक्सी व्यवसायिकांचा 'गोवा माईल्स' विरोधात संप; मुख्यमंत्र्यांचे चर्चेसाठी आवाहन

गेल्या काही वर्षांपूर्वीच ही योजना तयार करण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. आता परिवहन विभागाकडून नव्या वर्षात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मुंबईतील टॅक्सी टपावर कोणत्या प्रकारचे दिवे असावेत, त्यांची प्रकाशाची क्षमता किती असावी, यावर परिवहन विभाग अभ्यास करत आहे. लवकरच दिवे तयार करणार्‍या कंपनीबरोबर चर्चा करुन मुंबई उपनगरातील टॅक्सीसाठी दिवे तयार करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.

दिवे कशाप्रकारे काम करतील?

टॅक्सीवर दोन रंगांचे दिवे लावले जातील. त्यामुळे प्रवाशांसाठी टॅक्सी उपलब्ध आहे की नाही, याची माहिती दिली जाईल. यासाठी ठराविक दोन रंग असतील. त्याचे नियम परिवहन विभाग जाहीर करणार आहे. टॅक्सीमध्ये प्रवासी नसताना चालक टॅक्सी व्यस्त आहे असे दाखवू शकणार नाही. कारण, हे दिवे टॅक्सीच्या मीटरला जोडलेले असतील.

Intro:मुंबईतल्या काळ्‍या पिवळ्या टॅक्सिनवर आता दिव्य बसणार आहे मुंबईतील टॅक्सी चालक आणि त्याचे पकडण्यासाठी असणारे प्रवासी यांच्यामध्ये अनेक वेळा वाद होताना दिसतो त्यामुळे यावर काहीतरी तोडगा म्हणून परिवहन विभागाने बाहेरील देशातील टॅक्सिंनप्रमाणे मुंबईतील टॅक्सीनवर दिवे लावण्याचा निर्णय घेतला आहेBody:काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या बोनेटवर साधे मीटर होते. मीटर अप असल्यावर टॅक्सी प्रवाशांसाठी उपलब्ध आहे, तर टॅक्सीचा मीटर डाऊन असल्यावर टॅक्सीत प्रवासी आहेत, अशी माहिती मिळायची, मात्र कालांतराने शहरातील सर्व टॅक्सींमध्ये इलेक्ट्रॉनिक मीटर लावण्यात आले. हे मीटर टॅक्सीच्या आतमध्ये बसवल्याने बाहेरील प्रवाशाला टॅक्सीची उपलब्धता कळत नाही. याचाच गैरफायदा घेत काही टॅक्सी चालक सर्रासपण भाडे नाकारत होते.त्यामुळे हे दिवे बसल्याने याला आला बसेल.भारतात प्रथमच हा प्रयोग मुंबईत केला जाणार आहे

कशाप्रकारे काम करतील बसवलेले दिवे

टॅक्सीवर दोन रंगांचे दिवे लावले जातील. त्यातून टॅक्सी प्रवाशांसाठी उपलब्ध आहे का? याची माहिती एका दिव्यातून, तर टॅक्सी उपलब्ध नाही? याची माहिती दुसर्‍या दिव्यातून कळणार आहे. टॅक्सीवर बसवलेले दिवे हे लाल हिरवा निळा किंवा पिवळा या ठराविक दोन रंगात असतील त्यानुसार त्याची ओळख आणि नियम परिवहन विभाग पुढे जाहीर करील टॅक्सी मध्ये प्रवासी नसतानादेखील जर चालक टॅक्सी व्यस्त आहे असं दाखवू शकणार नाही कारण मीटर आणि दिवे यांना जोडले जाणार आहे त्यामुळे अशी फसवण्याची देखील शंका येणार नाहीConclusion:अनेक टॅक्सी आणि रिक्षा प्रवासी हात दाखवूनही थांबत नाहीत. त्याच्या तक्रारी प्रवाशांकडून परिवहन विभागाकडे करण्यात येत असतात. प्रवाशांच्या आणि टॅक्सी-रिक्षा चालकांच्या समस्या लक्षात घेऊन टॅक्सी आणि रिक्षा टपावर आता लाल आणि हिरवा दिवा लागणार आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी ही योजना तयार करण्यात आली होती.मात्र काही कारणास्तव त्याची अंमलबजावणी झाली नव्हती.

नव्या वर्षात या योजनची अंमलबजावणी आता परिवहन विभागाकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी परिवहन विभागा तयारीला लागला आहे. आगोदर मुंबईतील टॅक्सी टपावर कोणत्या प्रकारचे दिवे असावेत, त्यांची प्रकाशाची क्षमता किती असावी? यावर परिवहन विभाग अभ्यास करत आहे. लवकरच दिवे तयार करणार्‍या कंपनीबरोबर चर्चा करुन मुंबई उपनगरातील टॅक्सीसाठी दिवे तयार करण्यात येणार आहे. अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे

टॅक्सीनवर दिवे बसवण्यासाठी सर्व टॅक्सी संघटना या निर्णयाचे स्वागत करत आहे परंतु टॅक्सिंवर जे दिवे बसवण्यात येणार आहेत ते प्रशासनाने बसवावे असे टॅक्सीचालक परिवहन विभागाकडे मागणी करत आहेत त्यामुळे आता परिवहन विभाग हे दिवे बसवता का की चालकांनाच त्यांच्या खिशातून बसवायला सांगत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.