ETV Bharat / state

लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर राज्यात 13 हजारांच्यावर उद्योगांना परवाने - corona update

लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर उद्योग विभागाने काही अटी व शर्थीसह उद्योग सुरू करण्यासाठी परवाने जारी केले आहेत.

Breaking News
author img

By

Published : Apr 27, 2020, 8:52 PM IST

मुंबई - लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर उद्योग विभागाने काही अटी व शर्थीसह उद्योग सुरू करण्यासाठी परवाने जारी केले आहेत. २० ते २७ एप्रिलदरम्यान १३ हजार ४४८ उद्योगांना परवाने जारी करण्यात आल्याचे उद्योग विभागाने स्पष्ट केले आहे.

केंद्र शासनाने २० एप्रिलपासून लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केले व काही अटी शर्थीवर उद्योग सुरू करण्यासाठी परवानी दिली आहे. केंद्राच्या मार्गदर्शक सूचना डोळ्यासमोर ठेवून उद्योग विभागाने उद्योग सुरू करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविली आहे. परवाने मिळवण्यासाठी आतापर्यंत २५ हजार अर्ज दाखल झाले आहेत. अटी व शर्थीचे पालन करणाऱ्या सुमारे १३ हजार ४४८ उद्योगांना परवाने देण्यात आले आहेत.

उद्योग सुरू करताना सामाजिक अंतर राखणे, कामगारांची कंपनी किंवा कारखान्याच्या आवारात राहण्याची सोय करणे, कामगारांचे दळणवळण टाळणे आदी सूचनांचे पालन करणाऱ्यांनाच परवाने दिले जात आहेत. वरील सूचनांचे पालन करण्याची तयारी असलेल्या उद्योगांनाच परवानगी दिली जात आहे.
दरम्यान, १७ एप्रिलपूर्वी सुमारे अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या ६ हजार ५८९ उद्योगांना परवाने दिले आहेत.

मुंबई महानगर क्षेत्रात परवानगी नाही
मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पनवेल यासह 12 महानगरपालिका क्षेत्रात जिथे रेड झोन आहे, त्या ठिकाणी अद्याप उद्योग सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. उद्योग सुरू होणे काळाजी गरज आहे. यामुळे उद्योगचक्राला गती मिळेल. शिवाय कामगारांना रोजगार मिळेल, असा आशावाद उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज घेतलेल्या आढावा बैठकीत व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.