मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाची रुग्ण संख्याही झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर अधिक भार हा निर्माण झालेला आहे. मुंबईमध्ये सरासरी दिवसाला दहा हजार रुग्ण सापडत आहेत. कोरोना झालेले रुग्ण हे सरकारी रुग्णालयात जाण्यापेक्षा खासगी रुग्णालयात जाण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयातील आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड हे शिल्लक नाहीत. काल (दि. 14 एप्रिल) दिवसभरात मुंबईमध्ये फक्त 12 व्हेंटिलेटर बेड आणि 45 आयसीयू बेड शिल्लक होते, अशी प्राथमिक माहिती मुंबई महानगरपालिकेने दिलेली होती.
एकीकडे मुंबईमध्ये आरोग्य व्यवस्थेवरती ताण निर्माण होत असताना मुंबई महानगरपालिकेने 2 हजार बेड असलेले रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांना दिलेली आहे. पहिल्या टाळेबंदीच्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेने बांद्रा बीकेसी येथील जम्बो कोविड केअर सेंटर हे 2 हजार बेड उपलब्ध असलेल कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले होते. या जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी लसीकरणाची यंत्रणा इथे उभी केलेली होती. पण, कोरोनाग्रस्तांचे नातेवाईक रुग्णाला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यापेक्षा खासगी रुग्णालयासाठी त्यांची जास्त पसंती असल्यामुळे सरकारी रुग्णालयामधील बरेच बेड हे रिकामे आहेत.
मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि राज्य प्रशासन युद्धपातळीवर ती काम करत आहे. 15 दिवसांची संचारबंदी राज्य प्रशासनाने लावलेली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमध्ये आळा बसेल, असे राज्य प्रशासनाला वाटत आहे. त्यामुळे हा पंधरा दिवसांची संचारबंदी राज्य प्रशासनाने लावलेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये मुंबई महानगर पालिकेची यंत्रणाही युद्धपातळीवर ती काम करत आहे. नवीन कोविड केअर जम्बो रुग्णालय बांधण्याच्या तयारीत मुंबई महानगरपालिका आहे. पण, या संपूर्ण पंधरा दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या किती प्रमाणात आटोक्यात येणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - मुंबईत कलम 144 ची अंमलबजावणी, वर्षभरात 60 हजारांहून अधिक जणांवर गुन्हे दाखल