मुंबई - उद्धव ठाकरे यांना हिंदू धर्मीय संघटनांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांची लोकप्रियता वाढत आहे. यामुळे आशिष शेलार आणि भाजपा वाले बावाचळले आहेत. शेलार यांना २०१७ मध्येही पालिका जिंकता आली नव्हती. यामुळे ते असे बिनबुडाचे आरोप करत आहेत. लोकांच्या प्रश्नांवर त्यांनी वाचा फोडावी, असे आवाहन मुंबईच्या माजी महापौर व शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी केले Kishori Pednekar criticized BJP आहे. याकूब मेमन यांच्या कबरीसाठी पालिकेने कोणतीही परवानगी किंवा पैसे दिलेले नाहीत.
भाजपच्या आरोपाला प्रत्त्युत्तर -१९९३ मध्ये मुंबईत बॉम्बब्लास्ट झाला होता. त्यामध्ये सहभागी याकूब मेमन याला फासी झाली होती. त्यानंतर त्याचे शव त्याच्या कुटुंबीयांनी मुंबईच्या मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तानात त्याचे शव दफन केले होते. याकूब मेमन याच्या कबरीचे Yakub Memon Grave Decoration सुशोभीकरण करण्यात आले असून त्यावर रोषणाई करण्यात आली आहे. त्यानंतर भाजपाने उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यावर किशोरी पेडणेकर बोलत Kishori Pednekar on Yakub Memon Grave Decoration होत्या.
यावर आधी वाचा फोडा - यावेळी बोलताना, तुमचं सरकार आहे. जुने मुडदे काढून लोकांना भ्रमित करू नका, लोकांच्या प्रश्नावर ती उत्तर द्या. ते शंभर दिवस कुठे गेले ? लोकांच्या अकाउंट मध्ये १५ लाख रुपये येणार होते त्याचं काय झालं, पेट्रोलचे भाव वाढत आहेत, यावर आधी वाचा फोडा. मुंबई महाराष्ट्रात आणि देशात अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर बोलले जात नाही. जातीजातीमध्ये पेड कसा निर्माण होईल दंगली कशा घडवल्या जातील, याकडे यांचे लक्ष आहे. अडीच वर्षाच्या कार्यकाळात लोकांच्या हिताची कामे झाली. त्याआधी पाच वर्ष आणि आता तुम्ही आहात, जे काय बेकायदेशीर असेल ते तोडा. असे आवाहन पेडणेकर यांनी केले.
त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे - कब्रस्तान हे खाजगी ट्रस्टच्या मालकीचा आहे. पालिकेने मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी दिलेला नाही. जे कोणी देशद्रोही आहे ते महाराष्ट्र आणि मुंबई द्रोही आहेत. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, मुसलमानांच्या टोप्या घालायच्या त्यांना पेढे भरवायचं, त्यांना घरात घ्यायचं हे सर्व करताना तुम्हाला काही वाटलं नाही का ? असा सवाल पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. Kishori Pednekar criticized BJP Over Yakub Memon Grave Decoration Issue