मुंबई : कोरोना काळात लॉकडाऊन दरम्यान उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हद्वारे राज्यातील नागरिकांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांच्यावर टीका करण्यात आली. आज लॉकडाऊन नसताना आताच्या मुख्यमंत्र्यांवर फेसबुक लाईव्ह करण्याची वेळ ( CM Eknath Shinde Facebook Live ) आली आहे. असा टोला शिवसेनेच्या प्रवक्त्या व मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाला लगावला ( Kishori Pednekar criticize Eknath Shinde ) आहे.
संताजी धनाजी प्रमाणे उद्धव ठाकरे दिसतात : काल मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे महाराष्ट्रातील नागरिकांशी संवाद साधला यावर किशोरी पेडणेकर बोलत होत्या. कोरोना काळात ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली त्यांनाच आज फेसबुक लाईव्ह करावे लागले आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर होणे गरजेचे आहे असे पेडणेकर म्हणाल्या. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत, तसेच जे शिवसेना सोडून गेले आहेत त्यांच्यामधील काही आमदार नाराज आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे हे आमदार परत जातील अशी भीती फुटीर आणि भाजपाला आहे. यामुळे त्यांना संताजी धनाजी प्रमाणे उद्धव ठाकरे दिसत आहेत असे पेडणेकर म्हणाल्या. राज्यात ओला दुष्काळ पडल्याने शेतकरी चिंतेत आहे. शेतकऱ्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलोय. उद्धव ठाकरे बांधावर गेले होते. शेतकऱ्यांसाठी जे करायला हवे ते नेते करत आहेत. आमचे दौरे घड्याळाच्या काट्यावर मोजत आहात मात्र आमचे दौरे घर टू ऑफिस आणि ऑफिस टू घर असे नाहीत असा टोला पेडणेकर यांनी लगावला.
मनसे सरड्या सारखा रंग बदलणारा पक्ष : मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना, हा पक्ष कधीही आपल्या भूमिकेवर ठाम उभा राहिलेला नाही. सतत यांची भूमिका बदलत आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः याचे काय सूरू होते अस आश्चर्य व्यक्त केले आहे. सरड्यापेक्षा लवकर रंग बदलणारा हा पक्ष आहे असे पेडणेकर म्हणाल्या. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या आरोपावरून बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर बोलताना सी ग्रेड पासुन वर येण्यासाठी हे सूरू आहे. हे नौटंकी दांपत्य आहे. बच्चू कडू चांगले व्यक्तिमत्त्व आहे ते राणा दाम्पत्याला पुरुन उरतील असे पेडणेकर ( Kishori Pednekar criticize MNS ) म्हणाल्या.
सर्व देवी देवतांचे फोटो लावा : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो लावण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना सर्व देवी देवतांचे फोटो लावा ज्यामुळे डॉलरचा भाव वधारेल असा टोला पेडणेकर यांनी लगावला आहे. शिवाजी महाराज आणि देवी देवतांचे फोटो लावण्याची मागणी केली जायेत, चांगले आहे. आमचं तर म्हणणं आहे बाबासाहेब आंबेडकरांचा पण फोटो लावा असे पेडणेकर म्हणाल्या. शिवसेनेच्या शाखा बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांनी वाढवल्या आहेत. त्यांच्यावर कब्जा मिळवण्यासाठी सरकार देखील पाठिंबा देते त्याचा आम्ही निषेध करतो असे पेडणेकर म्हणाल्या.