ETV Bharat / state

Kirit Somayya : किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ, किरीट सोमय्यांनी निर्मल नगर पोलिसात केली तक्रार.. काय आहे प्रकरण - Former Mayor Kishori Pednekar

दादर पोलीस ठाण्यामागोमाग भाजपा नेते किरीट सोमैय्या ( BJP leader Kirit Somaiya ) यांनी खार येथील निर्मल नगर पोलीस ठाण्यात जाऊन माजी महापौर किशोरी पेडणेकर ( Former Mayor Kishori Pednekar ) यांच्या विरोधात फसवणूक, खोटारडेपणा, फॉर्जरी आणि गरीब झोपडपट्टीतील रहिवाशांची SRA सदनिका हडप केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. निर्मलनगर पोलिसांनी चौकशी करून याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती, भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी दिली.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 4, 2022, 9:22 PM IST

मुंबई : दादर पोलीस ठाण्यामागोमाग भाजपा नेते किरीट सोमैय्या ( BJP leader Kirit Somaiya ) यांनी खार येथील निर्मल नगर पोलीस ठाण्यात जाऊन माजी महापौर किशोरी पेडणेकर ( Former Mayor Kishori Pednekar ) यांच्या विरोधात फसवणूक, खोटारडेपणा, फॉर्जरी आणि गरीब झोपडपट्टीतील रहिवाशांची SRA सदनिका हडप केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. निर्मलनगर पोलिसांनी चौकशी करून याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती, भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी दिली.

काय आहे प्रकरण - नुकतेच दादर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये (एसआरए) स्वत:त फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून नऊ जणांची सव्वा कोटींना फसवणूक केल्याच्या प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची दादर पोलिसांनी मंगळवारी अडीच तास चाैकशी केली होती. पोलिसांनी यादरम्यान त्यांच्याकडे काही कागदपत्रांची देखील मागणी करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, या दाखल गुन्ह्यासह किशोरी पेडणेकर यांच्यावर आणखी काही गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.गेल्या शुक्रवारी पेडणेकर दादर पोलीस ठाण्यात चौकशीला हजर झाल्या.

Kirit Somayya
किरीट सोमय्यांनी किशोरी पेडणेकरांच्या विरोधात निर्मल नगर पोलिसात केली तक्रार

पोलीसांनी केली चौकशी - सायंकाळ झाल्याने १५ ते २० मिनिटे चाैकशी करुन त्यांना शनिवारी सकाळी चाैकशीला बोलवण्यात आले होते. मात्र त्या गैरहजर राहिल्या. अखेर मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास किशोरी पेडणेकर दादर पोलीस ठाण्यात हजर झाल्या होत्या. गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची सुमारे अडीच तास कसून चाैकशी करुन त्यांचा जबाब नोंदविला. दुपारी पावणे दोनच्या सुमारास त्या पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्या. किशोरी पेडणेकर यांचा जबाब नोंदवून घेतला असून आवश्यकता भासल्यास त्यांना पुन्हा चाैकशीला बोलावण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.