मुंबई: पश्चिम रेल्वे वरील आज अंधेरी ते जोगेश्वरी दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे काही ट्रेन अंधेरी ते जोगेश्वरी दरम्यान थांबल्या. त्यामुळे चर्चगेट ते बोरवलीला जाणाऱ्या आणि बोरवलीकडून चर्चगेट कडे जाणाऱ्या ट्रेन उशिरा धावत आहे.
जनतेला त्रास सहन करावा लागला: आज सुमारे साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास अंधेरी कडून चर्चगेट कडे येताना आणि चर्चगेट कडून अंधेरी कडे जाताना रेल्वे मार्गावर पॉइंट फेल्युअर झाले. त्यामुळे दोन्ही बाजूच्या लोकल ट्रेन काही काळ उशिराने धावत आहे. तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त केला गेला. मात्र त्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागला.
पॉईंट फेल्युअर: यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे (Western Local Train) जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर (Sumit Thakur) यांच्यासोबत ईटीव्ही भारत ने संवाद केला असता त्यांनी सांगितले की, अंधेरी आणि जोगेश्वरी दरम्यान आणि डाऊन दोन्ही मार्गावर पॉईंट फेल्युअर झाले अशी घटना घडली. तात्काळ दुरुस्ती केली गेली.