ETV Bharat / state

'सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत', म्हणून... - आज के शिवाजी-नरेंद्र मोदी

उदयनराजे यांनी अनेकजण स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेतात, असे म्हणत शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

Sharad Pawar
शरद पवार
author img

By

Published : Jan 14, 2020, 8:18 PM IST

मुंबई - होय, शरद पवारच जाणता राजा आहेत, असे म्हणत गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजे भोसलेंना प्रत्युत्तर दिले आहे. अनेकजण स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेतात. पण, जाणता राजा या जगात फक्त एकच आहे, ते म्हणजे शिवाजी महाराज, असे म्हणत माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली होती.

  • होय शरद पवार हे "जाणता राजा " आहेत. हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता म्हणजे शरद पवार. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न,औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न,स्त्रीयांचे प्रश्न..

    प्रश्नांची मालिका सांगा.सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत. म्हणून.. pic.twitter.com/UQarxwgSuG

    — Office of Dr. Jitendra Awhad (@AwhadOffice) January 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून राजकीय वातावरण तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानं भाजपला टीकेला सामोरं जावं लागत आहे. त्याचवेळी उदयनराजे यांनी अनेकजण स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेतात, असे म्हणत शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

होय शरद पवार हे जाणता राजा आहेत. हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता म्हणजे शरद पवार. इथल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न, इथल्या औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, स्त्रियांचे प्रश्न, प्रश्नांची मालिका सांगा सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत. म्हणून शरद पवार हे जाणता राजा आहेतच, असे ट्वीट डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.