मुंबई Jalandhar Gangsters Arrested: हे दोघेही आरोपी 13 ऑक्टोबरला विभाग क्रमांक 6 पोलीस स्टेशन, जालंधर येथे खून आणि अपहरणाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात वॉंटेड होते. या प्रकरणी जालंधर पोलिसांनी आधीच जालंधर पश्चिमच्या आमदार शीतल अंगुराल यांचा सहकारी मुकेश सेठी याला अटक केली होती.
हॉटेलमध्ये सापळा रचून अटक: इतर दोन आरोपी मुंबईत कुठेतरी लपून बसल्याची गुप्त माहिती जालंधरचे पोलीस आयुक्त कुलदीप सिंह चहल यांना मिळाली होती. त्यानंतर जालंधर पोलिसांनी मुंबई पोलिसांची मदत घेतली. कक्ष 5 चे प्रभारी घनश्याम नायर यांनी सांगितले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानंतर पंचम नूर सिंग (वय 32) आणि हिमांशू माता (वय 30) या दोन आरोपींना अटक करण्यात आली. कुर्ला परिसरात विनोबा भावे नगर येथील हॉटेलमध्ये सापळा रचून वॉन्टेड गुन्हेगार पकडला गेला. दोन्ही आरोपींविरुद्ध जालंधर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि अपहरणासह शस्त्रास्त्र कायद्याचे १५ गुन्हे दाखल आहेत.
हॉटेलमध्ये लपून बसले होते आरोपी: विशेष म्हणजे, 13 ऑक्टोबरला जालंधर पोलिसांनी मुकेश सेठी, पंचम आणि हिमांशू यांच्यासह 10 जणांविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम 307 (हत्येचा प्रयत्न), 365 (अपहरण) आणि 120-बी (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हे दाखल केले होते. सेठीच्या अटकेनंतर, आप पक्षाचे एकमेव लोकसभा खासदार सुशील कुमार रिंकू आणि जालंधर पश्चिमेच्या आमदार शीतल अंगुरल यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत; कारण शीतल अंगुरल यांनी तिच्या सहकाऱ्याच्या अटकेनंतर रविवारी तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिंकू विरोधात तक्रार केली आहे. गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, यूनिट 5 चे प्रभारी पोलीस निरीक्षक घनश्याम नायर यांना कुर्ल्यातील एका हॉटेलमध्ये पंजाबमधील काही गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले दोघेजण लपून बसल्याची माहिती मिळाली होती. दोन गुन्हेगार लपल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी प्रथम त्यांची ओळख पटवली आणि दोघेही गुन्हेगार असल्याची खात्री झाल्यावर त्यांना अटक करण्यात आली.
आरोपींविरुद्ध पंजाबमध्ये 11 गुन्हे दाखल: गुन्हे शाखेने या दोन्ही आरोपींना पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी दोघांनाही ट्रान्झिट रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असून त्यांना पंजाबला नेत आहे. या दोघांविरुद्ध पंजाबमध्ये एकूण 11 गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा:
- Crypto Currency Investment Fraud: क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडून फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक
- Soumya Viswanathan Murder Case : टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरण, १५ वर्षांनंतर पाचही आरोपी दोषी
- Delhi Crime News : 20 वर्षानंतर दुहेरी खून प्रकरणात नौदलाच्या माजी कर्मचाऱ्याला अटक, पोलिसांना 'असा' दिला होता चकवा