ETV Bharat / state

Jaipur Mumbai Train Firing: चेतन सिंहच्या साहित्यिक भाषेमुळे गोळीबाराचे कारण उलगडेना! ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत होणार चौकशी

मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये सोमवारी अंदाधुंद गोळीबार करून चार जणांची हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणातील आरोपी जीआरपी पोलीस कॉन्स्टेबल चेतन सिंह याच्याविरुद्ध बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी त्याला बोरिवली कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने आरोपी चेतन सिंहला सात ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चेतन सिंहची पोलीस कसून चौकशी करत आहेत. मात्र चौकशीत तो साहित्यिक भाषेचा वापर करत असल्याचे एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

Jaipur Mumbai Train firing
जयपूर मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार
author img

By

Published : Aug 2, 2023, 7:42 AM IST

मुंबई : जयपुर पॅसेंजर एक्सप्रेसमध्ये गोळीबार केलेला आरपीएफचा पोलीस कॉन्स्टेबल चेतन सिंह याच्याकडे एआरएम बीसी-58 8612 आणि वीस काडतूसे एक्सकॉटिंगसाठी देण्यात आली होती. या गोळीबारादरम्यान चेतनने 9 राउंड झाडले आहे. ती रायफल घेऊन दहिसर आणि भाईंदर रेल्वे स्थानकादरम्यान चेतन सिंह पळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, जिगरबाज पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आरोपीला पकडले. मृत्यूमुखी पडलेल्या चौथ्या प्रवाशाची ओळख पटली आहे. सय्यद सैफुद्दीन (46 वर्ष) असे मृताचे नाव असून तो तेलंगणामधील रहिवाशी आहे.

आरोपीवर साहित्यिक प्रभाव : चेतन सिंहवर साहित्यिक प्रभाव असल्याचे पोलिसांना तपासात दिसून आले आहे. त्याची पत्नी उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे आपल्या दोन मुलांसहित राहते. आरोपी चेतन सिंहने आपल्या दोन्ही मुलांची नावे देखील साहित्यिक ठेवले आहेत. मुलाचे नाव सारांश तर मुलीचे नाव व्याख्या ठेवले असल्याचे वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तो गेल्या एक महिन्यांपासून लोअर परेल येथील बॅरकमध्ये इतर सह कर्मचाऱ्यांसोबत राहत होता. चेतन सिंह याच्यावर मानसोपचार तज्ञ डॉक्टरांचे उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. चेतन तापट स्वभावाचा असल्याचे त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे.

धार्मिक द्वेषापोटी गोळीबार : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चेतनला वलसाडला तब्येत बरी नसल्यामुळे उतरायचे होते. उतरू न दिल्याने एएसआय टिकाराम मीना यांच्यावर बी 5 या कोचमध्ये गोळीबार करून त्यांना ठार केले. त्याचप्रमाणे त्याच कोचमधील एका प्रवाशाला देखील गोळीबार करून ठार मारले. त्यानंतर पॅन्ट्रीच्या कोचमधील एकाला आणि त्याच्याच पुढे असलेल्या एस 6 या कोचमधील एका प्रवाशाला गोळीबार करून ठार केले. त्यामुळे टिकाराम यांच्यावर गोळ्या झाडून चेतन हा 8-9 कोच फिरला. मात्र, त्याच्या रस्त्यात आडव्या आलेल्या व्यक्तीवर त्याने बेछूट गोळीबार केला.

मयताची ओळख पटली : मृत सय्यद सैफ (वय 42) हा जोगेश्वरी लोखंडवाला येथे राहणाऱ्या 62 वर्षीय व्यक्तीकडे तो केअर टेकर म्हणून काम करत होता. तो देखील आपल्या मालकासह जयपूरला गेला होता. मात्र, मुंबईत परताना सैफवर गोळीबार झाला. परंतु सुरुवातीला त्याचे नातेवाईकांशी फोनवर बोलणे झाले. मात्र, गनपॉईंटवर त्याचा फोन काढून घेतला, असे सांगण्यात येत आहे. 1 ऑगस्टला मध्यरात्री 3 वाजता चारही मृतदेहाचे शवविच्छेदन झाले. पहाटे 4 वाजता मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

आरोपीला 'असे' पकडले : मिरा रोड रेल्वे स्थानक येण्यापूर्वी जयपूर पॅसेंजर एक्सप्रेसमधील पुलिंग साखळी ओढण्यात आली. त्यानंतर एक्सप्रेसचा वेग भाईंदर आणि दहिसर रेल्वे स्थानकामध्ये मंदावत असताना आरोपी चेतन सिंह (वय 30) याने एक्सप्रेसच्या डब्यातून एआरएम रायफल घेऊन उडी मारली. तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, आरपीएफचे पोलीस अधिकारी प्रतिक कृष्णा तेवंग आणि आरपीएफचे पोलीस कर्मचारी जे. पी. यादव तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचारी गायकवाड यांनी पळणाऱ्या आरोपीला जीवाची बाजी लावून पकडले.

गोळ्या घालून मारण्याची धमकी : झुडपात रायफलसह लपलेल्या चेतन सिंहला शस्त्रासह महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी पकडले. आरपीएफचे पोलीस अधिकारी तेवंग त्यांच्यासह अन्य पोलिसांना आरोपी चेतन सिंहने त्याच्या हातातील रायफलने गोळ्या घालून मारण्याची धमकी दिली होती. मात्र, आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तृत्ववान जवानांनी आरोपीला शस्त्रासह पकडून बोरिवली रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलीसांनी सहप्रवाशांचा जबाब नोंदवला : आरोपी चेतन सिंह हा एका महिन्यापूर्वी लोअर परेल वर्कशॉप येथे आरपीएफ दलात रुजू झाला होता. त्याआधी तो गुजरातमधील भावनगर रेल्वे पोलीस ठाण्यात तैनात होता. मात्र आईच्या तब्येतीचे कारण सांगून त्याने लोअर परेल वर्कशॉप येथे बदली करून घेतली होती. चेतनसोबत काम करणाऱ्या पोलिसांनीदेखील त्याची मानसिक स्थिती स्थिर नसल्याची माहिती दिली आहे. आरोपी चेतन सिंहला पकडणाऱ्या पोलिसांचा बोरिवली रेल्वे पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. त्याचप्रमाणे ज्या कोचमध्ये गोळीबाराची घटना घडली, त्या कोचमधील सहप्रवाशांचा बोरिवली रेल्वे पोलीसांनी जबाब नोंदवलेला आहे. पुढील तपासात पोलीस आवश्यक ते सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  1. Firing In Mumbai Jaipur Express : 'तो मानसिकदृष्ट्या आजारी होता, अधिकारी छळ करायचे';जवानाच्या कुटुंबियांचे धक्कादायक खुलासे
  2. Jaipur Mumbai Train Firing incident: सुरक्षा कर्मचारीच जर असे कृत्य करत असतील, तर याचा सखोल तपास झाला पाहिजे- मनिषा चौधरी
  3. Jaipur Mumbai Train firing : आरोपी आरपीएफ जवानाला आज तीन वाजता न्यायालयात करण्यात येणार हजर, गोळीबाराचे काय आहे प्रकरण?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.