मुंबई - जैन धर्मातील सिद्धांत आचरणात आणा. पर्यावरणाचे रक्षण करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले. त्या मुलुंड येथील महावीर जयंती कार्यक्रमात बोलत होत्या. ईशान्य मुंबईचे युतीचे उमेदवार मनोज कोटक यावेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाल्या, की आज तंत्रज्ञानामुळे आपले आयुष्य सोपे झाले आहे. पण, आपल्या आयुष्यातली मुल्ये कमी होत आहेत. शांती भंग होत आहे. ही शांती मिळवायची असेल तर जैनिजमशिवाय पर्याय नाही. जैनिजम विज्ञान, धर्म आणि श्रद्धेचा मिलाप आहे. श्रद्धा अतूट असते तेव्हा काहीच असंभव नसते. त्यामुळे जैन धर्माचे सिद्धांत आचरणात आणा असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, ईशान्य मुंबई मतदारसंघातील खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेचा विरोध असल्याने मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली. मनोज कोटक हे युतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत. प्रचार रॅली, पदयात्रा, लोकांच्या भेटी या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी प्रचार सुरू ठेवला आहे.