मुंबई - 26 जानेवारी हा दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. हाच दिवस जगभरात 'आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस'(इंटरनॅशनल कस्टम डे) म्हणून साजरा केला जातो. जगभरातील 176 देश हा दिवस साजरा करतात.
वर्ल्ड कस्टम डे निमित्त भारतीय सीमा शुल्क विभागाच्यावतीने गेट वे ऑफ इंडिया जवळील समुद्रात आंतरराष्ट्रीय नौकाविहार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 'कस्टम रेगाटा' या नावाने दरवर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत सीमा शुल्क विभागातील लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराच्या बोट चालकांनी भाग घेतला. या स्पर्धेत परदेशातील स्पर्धकांनीही सहभाग घेतला. भारतातून गोवा, चेन्नई, केरळ या राज्यातून स्पर्धकांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेचा एक्सक्लुजिव आढावा घेतला आहे ई टीव्ही भारतचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...