ETV Bharat / state

बीकेसी कोविड सेंटरमध्ये आज लसीकरण बंद; पुन्हा लसीचा तुटवडा

काल बीकेसीत लसीकरण झाले. तर आजसाठी अर्थात बुधवारसाठी रात्री लशीचा साठा येणार होता. त्यामुळे बुधवारी लसीकरण सुरू राहील, असे जाहीर करण्यात आले होते.

author img

By

Published : Apr 28, 2021, 12:18 PM IST

Mumbai corona vaccinations
मुंबई कोरोना लसीकरण

मुंबई - बीकेसी कोविड सेंटर लसीकरण केंद्रात आज लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. मुंबईतील सर्वात मोठे लसीकरण केंद्र असलेल्या या केंद्रात अनेकदा लसीचा तुटवडा निर्माण होत असल्याने आणि वेळेत नागरिकांना लसीकरण बंद असल्याचे समजत नसल्याने निराश होऊन परतावे लागत आहे. त्यानुसार आज सकाळपासून लसीकरणासाठी आलेले नागरिक निराश होऊन परतत होते.

रात्री 11.30 वाजेपर्यंत पाहिली वाट -

काल बीकेसीत लसीकरण झाले. तर आजसाठी अर्थात बुधवारसाठी रात्री लशीचा साठा येणार होता. त्यामुळे बुधवारी लसीकरण सुरू राहील, असे जाहीर करण्यात आले होते. पण रात्री 11. 30 वाजेपर्यंत लसीचा साठा आला नाही. तेव्हा रात्री उशिरा व्यवस्थापनाने लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती डॉ राजेश डेरे, अधिष्ठाता, बीकेसी कोविड सेंटर यांनी दिली आहे. तर आता जेव्हा केव्हा लसीचा साठा उपलब्ध होईल तेव्हा लसीकरण पुन्हा सुरू होईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

'या' केंद्रावर होते सर्वाधिक गर्दी -

बीकेसी कोविड सेंटरमधील लसीकरण हे सर्वात मोठे लसीकरण केंद्र आहे. तर देशातील सर्वाधिक लसीकरण या केंद्रावर होते. तर या केंद्रात मिळणाऱ्या सुविधा लक्षात घेता नागरिक मोठ्या संख्येने या केंद्रात येतात. पण अनेकदा लसीचा तुटवडा येथे निर्माण होत असल्याने आणि त्याची माहिती योग्य वेळी नागरिकाना उपलब्ध होत नसल्याने त्यांना केंद्रात येऊन परत जावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यात मोठी नाराजी दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.