मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी ईडीने मनी लॉड्रिंग प्रकरणी (Money laundering case) अटक केली. प्रिव्हेशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायद्याच्या तरतुदीनुसार दंडनीय गुन्ह्यांमध्ये मालिकांचा सहभाग असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ईडीच्या कोठडीनंतर मुंबई न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मलिक सध्या आर्थर रोड कारागृहात (Arthur Road Prison) आहेत. त्यांची कोठडीत आधी १८ एप्रिलपर्यंत वाढ केली होती. मलीकांचा तात्काळ सुटकेची मागणी करणारा अंतरिम अर्ज विशेष मुंबई न्यायालयात करण्यात आला होता. न्यायालयाने तो फेटाळून लावत त्यांना अधिक चार दिवसांची कोठडी सुनावली आहे.
त्यामुळे मलिक यांना २२ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे. मलिक यांच्यावतीने काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात बाजू मांडली. गॅंगस्टार दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिला मालमत्तेसाठी मलिक यांनी पैसे दिले होते.पारकरने ते दाऊद इब्राहिमला दिले. यामुळे टेरर फंडिंग झाल्याचा दावा करत ईडीने मलिक यांना ताब्यात घेतले.