मुंबई - राज्यातील सरपंचांचे सध्याचे मानधन वाढविण्याबरोबरच राज्यातील सर्व उपसरपंचांना दरमहा मानधन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातील 27 हजार 854 सरपंचांना आणि तितक्याच उपसरपंचांना या योजनेचा 1 जुलै 2019 पासून लाभ मिळणार आहे.
ग्रामपंचायत लोकसंख्येच्या निकषानुसार मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2 हजारापर्यंत लोकसंख्या असणाऱ्या गावासाठी सरपंचाचे मानधन 1 हजाराऐवजी 3 हजार, 2001 ते 8 हजार लोकसंख्येसाठी 1500 ऐवजी 4 हजार आणि 8 हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी 2 हजार ऐवजी 5 हजार रूपये, असे वाढवण्यात आले आहे.
उपसरपंचांचे मानधनही अशाच पद्धतीने लोकसंख्येच्या निकषानुसार अनुक्रमे 1 हजार, 1 हजार 500 आणि 2 हजार दरमहा देण्यात येणार आहे.