मुंबई - देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोना संक्रमणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतील 'शिवडी' या झोपडपट्टी परिसरात एकेकाळी मोठ्या प्रमाणात कोरोनाचे संक्रमण झाले होते. त्यावेळी तेथील नागरिकांनी पालिकेच्या नियमांचे योग्यपालन करून कोरोनावर नियंत्रण मिळवले होते. आता दुसऱ्या लाटेमध्ये देखील या नागरिकांनी नियमांचे पालन करून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली आहे. याठिकाणी सुरुवातीला ५० ते ८० रूग्ण एकाचवेळी सापडत होते. मात्र, आता हे प्रमाण १ ते ८ च्या दरम्यान आले आहे.
लोकसंख्येची माहिती घेऊन केले नियोजन -
मुंबईतील एफ साऊथ वार्डात शिवडी हा २०६ हा सर्वात मोठा प्रभाग आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत. या प्रभागात लोखसंख्या कमीत कमी 50 ते 60 हजार इतकी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या प्रभागात 3 हेल्थ पोस्ट बनवल्या आहेत. या हेल्थ पोस्टमध्ये परिसरातील मागच्या एाक वर्षातील कोरोना संक्रमित झालेल्या नागरिकांचा डेटा तयार केला आहे. या डेटामध्ये एका घरात किती व्यक्ती आहेत, किती सार्वजनीक शौचालये आहेत, परिसरातील नागरिकांना कोणत्या आजाराचा ञास आहे, त्याची यादी बनवली आहे. त्यानुसार या प्रभागात कोरोना उपाययोजना आखल्या गेल्या.
नागरिकांमध्ये केली जनजागृती -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरूवात झाल्यानंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. स्थानिक पातळीवर तरुणांचे व्हॉट्स अॅप ग्रुप बनवण्यात आले. परिसरात 19 मेडिकल कँम्प लावून ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तर, इतर वयोमर्यादेतील नागरिकांच्या तपासण्या सुरू केल्या. ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळत होती. त्या व्यक्तींना तातडीने क्वारंन्टाईन सेंटरमध्ये हलवून इतर कुटुंबियांना घरातच क्वारंन्टाईन केले गेले. क्वारंन्टाईन नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून परिसरात नेमलेले कोरोना वॉरियर त्यांना जे हवे ते घरपोच देत होते. ज्या ज्येष्ठ नागरिकांचे कोरोना लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केले नव्हते, अशा 900 ज्येष्ठ नागरिकांचे रजिस्ट्रेशन करून त्यांचे लसीकरण करण्यात आले.
केल्या विविध उपाययोजना -
संपूर्ण परिसरात 80 ते 90 सार्वजनिक शौचालये आहेत. सर्व ठिकाणी सॅनेटायझेशनचे काम दररोज केली जातात. त्याची नोंद ही ठेवली जाते. काही कारणास्तव सॅनिटायझेशन न झाल्यास तातडीने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर टाकले जाते. विशेष म्हणजे जे नागरिक कोरोना संक्रमित आहे. त्यांच्यासाठी एक विशेष शौचालय सोडण्यात आलेले आहे. झोपडपट्टी परिसरात एकञ न जमने, कौटुंबिक कार्यक्रम लग्न सोहळे कमी नागरिकांमध्ये केले जावेत. तर वाढ दिवस, बारसे, हळदीकार्यक्रम, स्पर्धा किंवा मुलांना बाहेर खेळण्यावर नागरिकांनीच बंदी घातलेली आहे. योग्य नियोजन करून आणि नियमांचे पालन करून नागरिकांनी या परिसरात कोरोनावर नियंञण मिळवले आहे.
हेही वाचा - LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..