मुंबई : शिंदे सरकारने नुकताच राज्यासाठी 49 हजार कोटीची गुंतवणूक केल्याचा करार केला आहे. याबाबत पवार यांना छेडले असता, महाराष्ट्रात गुंतवणूक येऊन तरुणांना रोजगार मिळत असेल, तर आनंद आहे. मात्र, महाराष्ट्रातून मोठी गुंतवणूक बाहेरच्या राज्यात गेल्याने लाखो तरुणांचा यामुळे रोजगार गेला आहे. शिंदे फडणवीस सरकारने याबाबत आत्मचिंतन करायला हवे. काही हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे, असे सरकार सांगत आहे. मात्र, प्रत्यक्षात किती प्रकल्प येतात. हे आगामी कळेल असा पवार म्हणाले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मंत्री सुभाष देसाई, आदित्य ठाकरे हे दाओसला गेले होते. शिंदे फडणवीर सरकारने कोणाला पाठवावे हा त्यांचा अंतर्गत निर्णय आहे. मात्र, राज्यासाठी गुंतवणूक यायला हवी, असही पवार म्हणाले आहेत.
हिंदी भाषा राष्ट्रभाषा व्हायला हवी : राष्ट्रभाषा हिंदी करावी, यावर ही अजित पवार यांनी भाष्य केले आहे. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. मराठी महाराष्ट्रात बोलली जाते. पण राष्ट्रभाषा हिंदी करावी की नाही यावर मतमतांतर आहेत. महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मला हिंदी भाषा राष्ट्रभाषा व्हायला हवी, असे वाटते असही अजित पवार म्हणाले आहेत. केंद्र सरकारने त्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असेही पवार म्हणाले आहेत. दरम्यान, पवार यांनी यावेळी बँकांच्या सीबीलवरून ही सरकारला जाब विचारला आहे.
ठाकरे गटाने पाठिंबा जाहीर केला : निवडणूक जाहीर झाल्यानंतर जागा वाटपाबाबत निर्णय घेतला होता. तरीही घोळ झाला. नाशिक पदवीधर निवडणुकीसंदर्भात सुधीर तांबे यांच्या विरोधात कॉंग्रेसने कारवाई केली आहे. सत्यजीत तांबेंवरसुध्दा कारवाई होणार आहे. नाशिक पदवीधर मतदार संघात आघाडीचा उमेदवार कोण असेल? याबाबत आम्ही चर्चा सुरू आहे. काँग्रेसची भूमिका नेमकी काय आहे? त्यानुसारच राष्ट्रवादी काँग्रेस निर्णय घेईल. शुभांगी पाटील यांनाही ठाकरे गटाने पाठिंबा जाहीर केला आहे, याबाबतही उद्यापर्यंत निर्णय होईल, असे अजित पवार म्हणाले आहेत.
मोठी गुंतवणुक होण्याची शक्यता : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेला उपस्थित आहेत. तेथे महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. हे सुसज्ज आणि आकर्षक पॅव्हेलियन दावोस येथे प्रमुख ठिकाणी आणि भारताच्या पॅव्हेलियनसमोरच आहे. त्यानंतर काही महत्वाच्या उद्योगांसमवेत सामंजस्य करार केले जाणार आहेत.
हेही वाचा : Symbol : धनुष्यबाण कुणाचा! ठाकरे गटाचा युक्तीवाद संपला; आजच फैसला?