मुंबई : बहुचर्चित क्रिकेट विश्वचषकाच्या तारखेकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. आयसीसीने आज विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 15 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना रंगणार आहे. त्यामुळे या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानच्या या सामना कसा रंगणार याची उत्सुकता क्रीडा रसिकांना लागली आहे. आयसीसीने विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
-
ICC World Cup 2023: Arch-rivals India, Pakistan to face-off at Ahmedabad's Narendra Modi Stadium this October
— ANI Digital (@ani_digital) June 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/euD6rPt0lE#WorldCup2023 #INDPAK #IndVsPak #NarendraModiStadium #Ahmedabad #ICCWorldCup2023 #Cricket pic.twitter.com/S76WMnoWnz
">ICC World Cup 2023: Arch-rivals India, Pakistan to face-off at Ahmedabad's Narendra Modi Stadium this October
— ANI Digital (@ani_digital) June 27, 2023
Read @ANI Story | https://t.co/euD6rPt0lE#WorldCup2023 #INDPAK #IndVsPak #NarendraModiStadium #Ahmedabad #ICCWorldCup2023 #Cricket pic.twitter.com/S76WMnoWnzICC World Cup 2023: Arch-rivals India, Pakistan to face-off at Ahmedabad's Narendra Modi Stadium this October
— ANI Digital (@ani_digital) June 27, 2023
Read @ANI Story | https://t.co/euD6rPt0lE#WorldCup2023 #INDPAK #IndVsPak #NarendraModiStadium #Ahmedabad #ICCWorldCup2023 #Cricket pic.twitter.com/S76WMnoWnz
विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे : यावर्षीचे यजमानपद भारताकडे देण्यात आले आहे. त्यामुळे या विश्वचषकाकडे जगभराचे लक्ष लागून आहे. विश्वचषकातील अनेक सामने मुंबईत होत आहेत. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या सामन्याकडेही क्रीडा रसिकांचे लक्ष लागून आहे. यावर्षीची विश्वचषक भारतात होणार असल्याने जगभरातील क्रीडा रसिक भारतात येणार आहेत. त्यामुळे भारतात विश्वचषकाच्या सामन्यात चांगलीच रंगत येणार आहे.
-
ICC World Cup 2023: England to play New Zealand in opening match on October 5. India to kick-start campaign against Australia on October 8. pic.twitter.com/dWSQwk1pFd
— ANI (@ANI) June 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">ICC World Cup 2023: England to play New Zealand in opening match on October 5. India to kick-start campaign against Australia on October 8. pic.twitter.com/dWSQwk1pFd
— ANI (@ANI) June 27, 2023ICC World Cup 2023: England to play New Zealand in opening match on October 5. India to kick-start campaign against Australia on October 8. pic.twitter.com/dWSQwk1pFd
— ANI (@ANI) June 27, 2023
भारतात खेळण्यास पाकिस्तानचा नकार : भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या सामन्यात खेळण्यास पाकिस्तान क्रिकेट मंडळाने ( PCB ) नकार दिला होता. त्यामुळे बीसीसीआय आणि पीसीबी यांच्या वादामुळे हे वेळापत्रक जाहीर करण्यास उशीर झाला आहे. त्यानंतर मात्र पाकिस्तानने भारतात विश्वचषकात खेळण्यास होकार दिल्यानंतर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्याचे निश्चित केले आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना खेळण्यावर आक्षेप : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. मात्र नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर खेळण्यास पाकिस्तानी खेळाडूंचा आक्षेप आहे. अहमदाबादमध्ये खेळण्यास पाकिस्तानी खेळाडूंना सुरक्षित वाटत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पाकिस्तानी क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नजीम शेठी यांनी आमच्या सरकारने अद्याप परवानगी दिली नाही. त्यामुळे परवानगी मिळाल्यानंतर याबाबत स्पष्टता येईल, असे स्पष्ट केले होते. मात्र पाकिस्तानी खेळाडूंचा बंगळुरू आणि चेन्नईत खेळण्यावरही आक्षेप आहे.
हेही वाचा -