मुंबई- देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही केंद्राला सर्वात अधिक महसूल देत आली आहे. दररोज तब्बल 70 लाख प्रवाशांची ने आन मुंबईची लोकल करते. मात्र, लोकल रेल्वेचे पश्चिम, मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्ग हे मृत्यूचे सापळे झाले आहेत.
हेही वाचा- देशात प्रथमच येणार कलाकार रोबो, मुंबई आयआयटीमध्ये सादर करणार कला
दर दिवशी लोकल रेल्वेच्या प्रवासादरम्यान लाखो लोक प्रवास करत असतात. यावेळेस लोकल रेल्वेच्या अनियमित वेळापत्रकामुळे बऱ्याच वेळा लोकल स्थानकांवर गर्दी होत असते. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ती कार्यप्रणाली सध्या रेल्वेच्या प्रशासनाकडे नाही, असे आरटीआय कार्यकर्ते समीर जवेरी यांनी म्हटलेले आहे. बऱ्याच वेळा लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे इंजिन फेल होण, रेल्वे रुळावरुन रेल्वे खाली उतरणे, याबरोबरच रेल्वेचे सिग्नल्स फेल गेल्यामुळे बऱ्याच वेळा रेल्वे वाहतुकीचा खोळंबा होतो. याचा परिणाम रेल्वे स्थानकावर गर्दी वाढून रेल्वे वाहतुकी दरम्यान अशा प्रकारच्या दुर्घटना घडत आहेत.
मुंबईतल्या सीएसएमटी, दादर, कुर्ला, वडाळा, चर्चगेट, मुंबई सेंट्रल, अंधेरी, बोरीवली अशा गजबजलेल्या रेल्वेस्थानकांवर दर दिवशी होणार्या लोकल दुर्घटनेमध्ये शेकडो जण जखमी होतात. तर मृत्यू पावणाऱ्यांचा आकडा पण मोठा आहे.
माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहिती नुसार-
- 2015-16 या सालात तब्बल 1576 प्रवाशांचा मृत्यू
- 2016-17 या सालात तब्बल 1509 प्रवाशांचा मृत्यू
- 2017-18 या सालात तब्बल 1518 प्रवाशांचा मृत्यू
- 2018-19 या सालात तब्बल 1415 प्रवाशांचा मृत्यू
2018 सालात सर्वाधिक1447 जणांचे मृत्यू झाले आहेत. हे रेल्वे रूळ ओलांडताना अपघात झाले आहेत. त्यात 695 जनांचा मृत्यू झाला आहे. तर धावत्या लोकल मधून पडून 401 लोकल प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. रेल्वेचा खांब लागून 16 जणांचा मृत्यू झाला आहे. इलेक्ट्रिक शाॅक लागून 13 जणांची मृत्यू झाला आहे. तर 13 जणांनी आत्महत्या केली आहे.