ETV Bharat / state

बारावी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करणार? शिक्षण तज्ञांनी उपस्थित केला प्रश्न - बारावीची परीक्षा रद्द

राज्य सरकारने महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयांचे स्वागत पालक आणि शिक्षण तंज्ञानाकडून करण्यात आले आहे. मात्र, बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करावे, याबाबत शासनाने आपली भूमिका तत्काळ स्पष्ट कारण्याची मागणी केली आहे.

12th class student evaluation news
बारावी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करणार कसे? शिक्षण तज्ञांनी उपस्थित केला प्रश्न
author img

By

Published : Jun 3, 2021, 10:24 PM IST

मुंबई - कोरोनाची गंभीर परिस्थिती, मुलांमधील वाढता प्रादुर्भाव, तिसऱ्या लाटेची शक्यता इत्यादी बाबी विचारात घेऊन राज्य सरकारने महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयांचे स्वागत पालक आणि शिक्षण तंज्ञानाकडून करण्यात आले आहे. मात्र, बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करावे, याबाबत शासनाने आपली भूमिका तत्काळ स्पष्ट कारण्याची मागणी केली आहे.

प्रतिक्रिया

राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत -

कोरोनाची सध्याची परिस्थिती व आजारांचा मुलांवर होणारा वाढता प्रार्दुभाव आणि परीक्षेचा संभ्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात वाढलेला तणाव विचारात घेता केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाची बारावी परीक्षा रद्द केली आहे. आता त्याच पाठोपाठ आज महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. या निर्णयांचे स्वागत शिक्षण तज्ञांकडून आणि पालक वर्गाकडून केला जात आहे. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुढचं शिक्षन घेण्यासाठी राज्य शासनाकने लवकरात लवकर मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख लवकरच जाहीर कारण्याची मागणी केली जात आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये -

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले की, राज्य सरकारने बारावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय हा स्वागताहार्य आहे. बारावी परीक्षा रद्द करण्याची भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषेदेने या अगोदरच मांडली होती. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या आरोग्याचा दृष्टिकोनातून निर्णय योग्य आहेत. परंतु पुढील काळात बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन योग्य पद्धतीने आणि सर्वमान्य झाले पाहिजे आहे, अशी आमची आशा आहेत. इंडिया व्हाईड पेरेंट्स असोसिएशनचे अनुभा श्रीवास्त यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा दृष्टिकोनातून राज्य सरकारने योग्य निर्णय घेतला आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी राज्य सरकारने तत्काळ विद्यार्थ्यांचे मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख लवकरच जाहीर करावी. जेणेकरून विद्यार्थांना पुढील शिक्षणाचे नियोजन करणे शक्य होईल.

लवकर जाहीर करणार निकालाची तारीख? -

बारावीच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी परीक्षेऐवजी पर्यायी व्यवस्थेचा विचार करावा, अशी राज्य शासनामार्फत केंद्र सरकारकडे विनंती करण्यात आली होती. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत एकसमान धोरण निश्चित करावे, अशीही केंद्राकडे मागणी केली होती. या विनंतीनुसार केंद्र सरकारने सीबीएसई व आयसीएसई या केंद्रीय मंडळांच्या परीक्षा रद्द केल्याचा निर्णय जाहीर केला. मागील १४ महिने विद्यार्थी अभ्यासाच्या व परीक्षेच्या तणावाखाली आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता व मानसिक स्वास्थ अबाधित राखण्यासाठी व राज्यातील विविध परीक्षा मंडळांच्या मूल्यमापनामध्ये एकसुत्रता असावी, यासाठी राज्य शासनानेही राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्य मंडळाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. या विद्यार्थ्यांचे अचूक मूल्यमापन करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग कटिबद्ध आहे, अशी प्रक्रिया शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

आता निकाल कसा लावणार? -

महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामुळे बारावीच्या 14 लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र, बारावीच्या परीक्षांचे मूल्यांकनाचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. आगोदरच सुप्रीम कोर्टात सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासंबंधी अ‌ॅड. ममता शर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान केंद्र सरकारला दोन आठवड्यामध्ये बारावीचा निकाल कसा लावणार हे सांगा, असा अल्टिमेटम दिला आहे. त्यात आता महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावणार, याकडे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा - वृक्षप्रेमींनी केली वृक्षावर शस्त्रक्रिया; बुडापासून तोडलेले झाड पुन्हा केले उभे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.