ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : तीन महिन्यात गृहविक्रीत 26 टक्क्यांनी घट, नव्या घरांची संख्याही 51 टक्क्यांनी घटली - world health emergency

कोरोना विषाणू फैलावाच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यात देशातील घरविक्रीत 26 टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षी जानेवारी ते मार्च 2019 ला 93 हजार 936 घरे विकली गेली होती. तर, यंदा जानेवारी ते मार्च 2020 पर्यंत 69 हजार 235 घरे विकली गेली आहेत. जानेवारीत 26 हजार 126 फेब्रुवारीत 23 हजार 987 तर मार्चमध्ये 19 हजार 122 अशी 69 हजार 235 घरे विकली गेली आहेत.

कोरोना इफेक्ट
कोरोना इफेक्ट
author img

By

Published : Apr 28, 2020, 10:42 AM IST

मुंबई - कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनचा बांधकाम व्यवसायाला बसणारा फटका दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालला आहे. कारण घरविक्री ठप्प असून मागील तीन महिन्यात घरविक्रीत 26 टक्क्यांची घट झाली आहे. तर दुसरीकडे बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या नव्या घरांच्या संख्येतही तब्बल 51 टक्क्यांनी घट झाली आहे. हे आकडे बांधकाम व्यावसायिकांच्या पोटात गोळा आणणारे ठरत आहेत.

बांधकाम व्यवसायात गेल्या कित्येक वर्षांपासून मंदी आहे. या मंदीतही कसेबसे हे क्षेत्र तरत होते. पण आता कोरोना प्रसार आणि लॉकडाऊनने या क्षेत्राला मोठा धक्का दिला आहे. एकीकडे ज्या मुंबई आणि एमएमआरमध्ये मोठ्या संख्येने गृहप्रकल्प आहेत. तीच मुंबई आणि एमएमआर देशातील कोरोनाचे मुख्य केंद्र बनले आहे. त्यामुळे बांधकामाला परवानगी मिळूनही काम सुरू करता आलेले नाही. तर, येथील परिस्थिती पाहता लॉकडाऊन कधी उठेल हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायाला बसणारा फटका मोठा आहे. अशात एका सर्व्हेक्षणाने बिल्डरांची चिंता आणखी वाढली आहे.

या सर्वेक्षणानुसार तीन महिन्यात देशातील घरविक्रीत 26 टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षी जानेवारी ते मार्च 2019 ला 93 हजार 936 घरे विकली गेली होती. तर, यंदा जानेवारी ते मार्च 2020 पर्यंत 69 हजार 235 घरे विकली गेली आहेत. जानेवारीत 26 हजार 126 फेब्रुवारीत 23 हजार 987 तर मार्चमध्ये 19 हजार 122 अशी 69 हजार 235 घरे विकली गेली आहेत.

गेल्या वर्षी मार्च 2019 मध्ये देशभरात 72 हजार 932 नवीन घरे विक्रीसाठी उपलब्ध झाले होते. आता मार्च 2020 मध्ये केवळ 35 हजार 668 नवीन घरे उपलब्ध आहेत. त्यामुळे नवीन घराचा आकडा 51 टक्क्यांनी घटला आहे. लॉकडाऊन आणि कोरोनाचा कहर असाच सुरू राहिला तर, हा फटका आणखी तीव्र होणार आहे. ही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.