मुंबई : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे निर्माण झालेले क्षेत्र तीव्र झाले आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर पुढचे ३-४ दिवस वारे जोरदार वाहणार आहे. राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबईला यलो अलर्ट दिला आहे. काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
15 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ ते १५ सप्टेंबरपर्यंत काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट विभागात १४ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नंदुरबार, नाशिक, जळगाव जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. १३ सप्टेंबरला जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. या दिवशी विदर्भातील सर्वच जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
नाशिकमध्ये मुसळधार, गोदावरी ओव्हरफ्लो
-
#WATCH | Maharashtra: Temples were submerged in Nashik as the river Godavari was overflowing due to heavy rainfall. pic.twitter.com/3wvpSDI6A0
— ANI (@ANI) September 13, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Maharashtra: Temples were submerged in Nashik as the river Godavari was overflowing due to heavy rainfall. pic.twitter.com/3wvpSDI6A0
— ANI (@ANI) September 13, 2021#WATCH | Maharashtra: Temples were submerged in Nashik as the river Godavari was overflowing due to heavy rainfall. pic.twitter.com/3wvpSDI6A0
— ANI (@ANI) September 13, 2021
नाशिकमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी ओसंडून वाहू लागली आहे. नाशिकमध्ये मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. पाहा व्हिडिओ
मुंबईतील पश्चिम उपनगरात रिमझिम, मुसळधार पाऊस
पश्चिम उपनगरातील बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, दहिसर विभागात अधून मधून रिमझिम पाऊस पडत आहे. कधी-कधी मुसळधारही पाऊस पडत आहे. त्यामुळे वातावरणामध्ये देखील गारवा निर्माण झाला आहे.
जिल्ह्यांना अलर्ट जारी
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आज तीव्र झाले आहे. पुढील तीन ते चार दिवसात महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर वेगाने वारे वाहणार आहे. तसेच राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. पुढील चार ते पाच दिवसांसाठी विविध जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अॅलर्ट जारी करण्यात आला असल्याचे जेष्ठ हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सांगितले.
हेही वाचा - मुंबई : लहान भावाशी मोबाईलवरून झालेल्या वादातून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या
हेही वाचा - अंबरनाथमध्ये कार आणि रिक्षाचा भीषण अपघात, चार जण ठार