ETV Bharat / state

विशेष: 'या' आहेत रुग्णालयांतील आगीच्या ह्रदयद्रावक दुर्घटना

आपल्या देशात आरोग्य व्यवस्थेला फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याचे विविध घटनांमधून वारंवार समोर आले आहे. गेल्या वर्षभरात रूग्णालयांना आगी लागल्याच्या अनेक लहान-मोठ्या घटना घडल्या आहेत. त्यातील काही घटनांमध्ये रूग्णांचे विनाकारण बळी गेले आहेत.

Fire News
आग दुर्घटना
author img

By

Published : Mar 26, 2021, 10:46 AM IST

मुंबई - भांडूपमधील ड्रीम मॉलमध्ये असलेल्या सनराइज रूग्णालयाला गुरुवारी रात्री 11 वाजून 49 मिनिटांनी आग लागली. याठिकाणी ७० रूग्ण उपचार घेत होते. यामध्ये, काही कोविड रूग्णांचाही समावेश आहे. अग्निशामक दलाला एकूण ९ मृतदेह सापडले आहेत. यातील सात जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला तर, दोघांचा मृत्यू कोविडमुळे अगोदरच झालेला होता. देशभरात आगीच्या अशाच काही ह्रदयद्रावक घटना मागील वर्षात घडलेल्या आहेत.

8 जानेवारी २०२१: भंडारा

शहरातील सामान्य रुग्णालयात १० नवजात बालकांचा विशेष अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत मृत्यू झाला. या आगीच्या घटनेने अनेकांच्या काळजाचे पाणी झाले. मुंबईपासून ९०० किमी अंतरावर असलेल्या भंडारा शहरात १० बालकांच्या मृत्यूने अनेकजण सुन्न झाले. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागली. SNCU मध्ये एकूण १७ नवजात बालके होती. या विभागामध्ये आऊट बॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी इन बॉर्नमधील सात बालके सुखरूप आहेत. तर आऊट बॉर्न युनिटमधील १० बालंकांचा मृत्यू झाला. अग्नीशमन दलाने ७ जणांना आगीतून सुरक्षितपणे वाचविले आहे. राज्य सरकारने मृत बालकांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली.

१० सप्टेंबर २०२०: वडोदरा

वडोदरामधील एसएसजी येथील बालकांच्या वॉर्डमध्ये मोठी आग लागली होती. या आगीतील ३५ रुग्ण हे एनआयसीयू तर १० हे पीआयसीयूमध्ये हलविण्यात आले होते.

९ ऑगस्ट २०२० : विजयवाडा

थेट कोव्हिड सेंटरमध्ये लागलेल्या आगीत आंध्रप्रदेशमधील ११ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये दोन महिलांचा समावेश होता. काहीजण हे आगीत सापडले होते. खासगी हॉटेल हे कोव्हिड सेंटर म्हणून चालविण्यात आले असताना ही आगीची दुर्घटना घडली होती. मृताच्या नातेवाईकांना आंध्रप्रदेश सरकारने ५० लाखांची मदत जाहीर केली होती.

६ ऑगस्ट २०२० : अहमदाबाद

अहमदाबादमधील कोव्हिड-१९ रुग्णालयात लागलेल्या आगीत ८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर ४० रुग्णांना आगीपासून वाचविण्यात यश मिळाले होते. या रुग्णांना अहमदाबादमधील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत जाहीर केली होती.

हेही वाचा-'भंडाऱ्यातील घटना प्रगतीशील महाराष्ट्राला काळिमा फासणारी'

२७ नोव्हेंबर २०२० - राजकोट

राजकोट येथे असलेल्या शिवानंत रुग्णालयात लागलेल्या आगीत ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. ही आग रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागली होती. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ३३ रुग्ण होते.

१३ ऑक्टोबर २०२० : मुंबई

मुंबईमधील खासगी रुग्णालयात आग लागल्यामुळे ४० रुग्णांना दुसरीकडे हलविण्यात आले होते. ही आग मुलुंडमधील खासगी रुग्णालयात लागली होती. सुदैवाने या घटनेत कोणताही रुग्ण जखमी झाला नाही.

५ सप्टेंबर २०२० : पुणे

पुण्यातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात असलेल्या अतिदक्षता विभागात आग लागली होती. या आगीतही सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

२३ मे २०२० : दिल्ली-

दक्षिण दिल्लीतील रुग्णालयात शॉर्टसर्किटने आग लागी होती. यामध्ये अनेक रुग्णांचे जीव धोक्यात सापडले होते. वेळीच आग आटोक्यात आल्याने ८ रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

९ जानेवारी २०२० : दिल्ली

नोएडामधीलईएसआयसी रुग्णालयात आग लागली होती. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी अग्नीशमन दलाचे पाच बंब आले होते. दोन तासात आग आटोक्यात आणण्यात यश आले.

१ जानेवारी २०२०: राजस्थान

राजस्थानमधील अलवार येथे असलेल्या रुग्णालयात मोठी आग लागली होती. या आगीच्या दुर्घटनेला २ डॉक्टर, ४ कर्मचारी यांना निलबंति करण्यात आले. या आगीत नवजात मुलीचा मृत्यू झाला. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात १५ नवजात अर्भके ठेवण्यात आली होती. त्यांना त्वरित दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले होते.

हेही वाचा - LIVE UPDATE : भांडूपमध्ये सनराइज रुग्णालयात आग, मृतांचा आकडा नऊवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.