मुंबई : मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या मार्गावर तिकीट तपासणी दीपा वैद्य आणि जैन मर्सिला या आपल्या तिकीट तपासण्याचे काम करत होत्या. (Heart Attack In Train at Mumbai) हे काम करीत असतानाच त्यांनी आपला डबा सोडला आणि दुसऱ्या लोकल ट्रेनच्या डब्यात प्रवेश केला त्या ठिकाणी त्यांनी तिकीट तपासणीचे काम सुरू केले. या डब्यामध्ये तिकीट तपासणीचे काम करत असतानाच 19 वर्षाची एक तरुणी तिला अस्वस्थ झालेले (Heart Attack To young Girl in Train) या तिकीट तपासणीस कर्मचाऱ्यांनी पाहिले. तिच्या चेहरा खूप घामेघाम झालेला होता. (Treatment on Heart Attack Suffering Girl) तिचे हातपाय थरथरत होते आणि ती कासावीस झालेली होती तिची स्थ तिची ही स्थिती मुख्य तिकीट तपासणी दीपावैद्य आणि झें मर्सिला यांनी पाहिले आणि त्यांना काहीतरी वेगळे त्यामधून लक्षात आले. (Life of young girl saved) तिला वैद्यकीय मदतीची गरज आहे असे त्यांना वाटले. (Latest news from Mumbai)
![Heart Attack To Girl In Train Mumbai](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17429364_devdootmahila.jpg)
धावत्या ट्रेनमध्ये बिघडली प्रकृती : त्यांनी तिची विचारपूस करत असतानाच त्यांना लक्षात आले की,'हिला तीव्र झटका आलेला आहे आणि त्यामुळेच हिच्या शरीराची स्थिती या प्रकारे झालेली आहे. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर प्रचंड घाम आलेला आहे. ती भेदरलेली आहे. पटकन इतर कर्मचाऱ्यांची मदत घेत रेल्वे स्थानकात असलेली क्लिनिक व्हील चेअर जी आहेत ती त्यांनी मागवली. व्हील चेअरवर या तरुणीला त्यांनी बसवले आणि तेथून रेल्वेच्या इमर्जन्सी मेडिकल सेंटरमध्ये नेले. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे त्या तरुणाईला वेळेत योग्य तो उपचार मिळाला.
नातेवाईकांना देण्यात आली माहिती : रुग्णाला दाखल करेपर्यंत दरम्यान मुख्य तिकीट तपासणीस यांनी त्या मुलीकडून तिच्या नातेवाईकांची माहिती घेतली होती. तिच्या नातेवाईकांना फोन करून याबाबतची माहिती दिली आणि काही काळानंतर तिचे नातेवाईक त्या ठिकाणी हजर झाले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या तरुणीला डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिची तब्येत आता सुधारत असल्याचे मुख्य तिकीट तपासणी दीपा वैद्य यांनी सांगितले.
सामाजिक कर्तव्यासाठी रेल्वे कर्मचारी दक्ष : यासंदर्भात मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी एके सिंग यांना विचारले असता त्यांनी सांगितले की "आमचे रेल्वे कर्मचारी सातत्याने आपले कर्तव्यावर काम करीत असताना अशा महत्त्वाच्या आणि जीव वाचवण्याच्या कामासंदर्भात तत्परता दाखवतात. रेल्वे पोलीस असो किंवा तिकीट तपासणीस, हे या संदर्भात मानवी संवेदनाने वागत असतात.