ETV Bharat / state

Health Check Up Mumbai : जागरूक पालक सुदृढ बालक अभियान; मुंबईत उद्यापासून १८ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींची होणार आरोग्य तपासणी

author img

By

Published : Feb 8, 2023, 11:09 PM IST

महाराष्ट्र राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत ९ फेब्रुवारी पासून 'जागरूक पालक सुदृढ बालक' विशेष अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, शिक्षण विभाग व समाजकल्याण विभाग यांच्या समन्वयाने सदर अभियान राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

Health Check Up Mumbai
जागरूक पालक सुदृढ बालक अभियान

मुंबई : मुंबईत मुंबई महानगरपालिकतर्फे 'जागरूक पालक-सुदृढ बालक' हे विशेष अभियान गुरुवार (९ फेब्रुवारी) पासून राबविण्यात येणार आहे. याद्वारे सुमारे २४ लाख मुला-मुलींची आरोग्य तपासणी केली जाईल. या अभियानाचे नियोजन, अंमलबजावणी व नियमित आढावा घेण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपलिका स्तरावर जिल्हा कृती दल स्थापन करण्यात आले, अशी माहिती उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कु-हाडे यांनी दिली.

'जागरूक पालक-सुदृढ बालक' अभियान : राज्यातील सर्व (ग्रामीण, शहरी व मनपा विभाग) ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी, संदर्भसेवा, प्रयोगशाळा तपासण्या व आवश्यकतेनुसार उपचार तथा शस्त्रक्रिया करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत ९ फेब्रुवारी पासून 'जागरूक पालक-सुदृढ बालक' विशेष अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, शिक्षण विभाग व समाजकल्याण विभाग यांच्या समन्वयाने सदर अभियान राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. हे अभियान यशस्वी होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे, प्रत्येक बालकापर्यंत अभियानाचा लाभ पोहोचवावा, असे निर्देश डॉ. संजीवकुमार यांनी यावेळी दिले.

येथे राबवले जाणार अभियान : या अभियान अंतर्गत, मुंबई शहर व उपनगर विभागातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, दिव्यांग शाळा व अंधशाळा, अंगणवाड्या, बालगृहे / बालसुधारगृहे, अनाथालये, समाज कल्याण व आदिवासी विभाग, वसतिगृहे (मुले/मुली), खासगी नर्सरी, बालवाड्या, खासगी शाळा व खासगी कनिष्ठ महाविद्यालये, तसेच शाळाबाह्य विद्यार्थी अश्या ० ते १८ वर्षापर्यंतच्या साधारण २४ लाख मुला-मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे, असे संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले. भारतीय वैद्यकीय संघटना, इंडियन असोसिएशन ऑफ बालरोगतज्ज्ञ, खासगी डॉक्टर, अशासकीय संस्था यांनी या अभियानात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

हे उपक्रम राबविण्यात येणार :

  • अभियान यशस्वीपणे पार पाडण्याकरीता विभागनिहाय सूक्ष्मकृती आराखडा तयार करण्यात आला आहे. मुंबई महानगरामध्ये शालेय आरोग्य विभाग व राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम (आर.बी.एस.के.) च्या ११२ पथकांद्वारे महानगरपालिका शाळा, महानगरपालिका अनुदानित शाळा, अंगणवाडी, बालवाडी येथील मुला-मुलींची / बालकांची तपासणी करण्यात येईल.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागात विशेष बाल आरोग्य पथक तयार करून त्या पथकामार्फत विभागातील अनुदानित शाळा, रस्त्यावरील मुले व शाळाबाह्य मुले यांची तपासणी करण्यात येईल. वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचेमार्फत विभागातील खासगी रुग्णालये, आयएमए/ रोटरी/ अशासकीय संस्था यांच्या मदतीने खासगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील मुलांची तपासणी करण्यात येईल.
  • शालेय आरोग्य पथक, आर. बी. एस. के. पथक व विभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या बाल आरोग्य पथकामार्फत तपासणीतील आवश्यकतेनुसार संदर्भित बालकांना द्वितीय, तृतीय स्तरावर उपचारांसाठी प्रसूतिगृहे व दवाखाने, सर्वसाधारण रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालये येथे पुढील उपचार व मार्गदर्शन देण्यात येईल.

हेही वाचा : Aditya Thackeray Jalna Visit : आदित्य ठाकरेंचे मोठे वक्तव्य, म्हणाले, 'मी वर्षावर जायला तयार...'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.